कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI

कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही कर्नाळा किल्ला मराठी माहिती म्हणजेच KARNALA FORT INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

कर्नाळा किल्ला मराठी माहिती व ठिकाण

कर्नाळा हा किल्ला मुंबई-महाड या राजमार्गावर आहे. ( गुगल मॅप )

हा किल्ला मुंबईकरांना जवळ असल्याकारणाने पावसाळ्याचे काही महिने सोडले तर नेहमी बऱ्यापैकी गर्दी या किल्ल्यावर आढळते.

पक्षांचे सुंदर अभयारण्य असल्याकारणाने निरनिराळे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. शासनाने अभयारण्याची व्यवस्था व निवासस्थानांची व्यवस्था चांगली ठेवली आहे.

बेगवती नदीच्या वायव्य दिशेला काळा हा किल्ला वसलेला आहे.

कर्नाळा किल्ला मराठी माहिती – रचना

कर्नाळ्याचा सुळका ४८ मीटर उंच असल्याकारणाने तो बऱ्याच लांबून आपल्याला दिसू शकतो. एकंदरीत किल्ल्याभोवतालचे वातावरण खूपच छान आहे.

साधारण दीड कि.मी. बांधून काढलेल्या वाटेने वरती गेल्यावर कर्नाळा किल्ल्याचा प्रचंड खडक सामोरा येतो. थोडेसे चालल्यावर पडक्या स्थितीतला पहिला दरवाजा लागतो.

नव्याने पायऱ्या बांधलेल्या आहेत.

या किल्ल्यावरील स्वच्छ, गार, वेगळ्या चवीचे पाणी दीर्घ काळ लक्षात येते. किल्ल्याच्या आतील बाजूस आपण गेल्यावर पडक्या इमारतीच्या भिंती व बुधल्याचा भाग दिसतो.

बुधल्याच्या तळाशी धान्य साठविण्याकरिता केलेल्या कोठ्या व पाण्याकरिता टाकी कोरलेली आहे.

येथे असलेल्या बुधल्याच्या माध्याजवळ आम्यामाशांची मोठ्या प्रमाणात पोळी लटकलेली आपणास दिसतात.

कर्नाळा किल्ल्याच्या तळाशी ठाकर नावाची जमात आहे.

तेथील लोक घाडसीपणाने पोळ्यातील मध काढायला येतात.

सराईत गिर्यारोहकांना या सुळक्यावर जाता येते. कर्नाळा किल्ल्याची रचना दोन हजार वर्षापूर्वी झालेली असावी.

ऐतिहासिक निर्देश

सन १६७० साली शिवाजीमहाराजांनी हा गड सर केला अशी नोंद आढळते.

संभाजीराजांच्या मृत्यूनंतर कर्नाळा पोर्तुगिजांनी सर केला.

काही काळ लोटल्यानंतर पुन्हा हा किल्ला मराठ्यांनी सर केला.

निसर्गाचे सुंदर वरदान लाभलेला कर्नाळा हा किल्ला एकदा तरी निश्चितपणे पाहायला हवा.

किल्ल्यावरील तसेच आजुबाजूचे वातावरण मोहक आहे. एस. टी. च्या वेळापत्रकात या किल्ल्याकरिता दिवसातून किमान दोनदा पुणे-कर्नाळा अशी गाड़ी ठेवल्यास जास्त सोयीस्कर होईल.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा