काटेपूर्णा अभयारण्य माहिती | KATEPURNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI

काटेपूर्णा अभयारण्य माहिती | KATEPURNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “काटेपूर्णा अभयारण्य मराठी माहिती” म्हणजेच “KATEPURNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

काटेपूर्णा अभयारण्य मराठी माहिती व ठिकाण

पर्यटनाचा विचार करता महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या जलाशयाच्या सभोवताली वसलेले काटेपूर्णा अभयारण्य हे एक उत्तम स्थान आहे. या अभयारण्याचा अंशतः भाग नवनिर्मित वाशिम या जिल्ह्यात समाविष्ट केलेला आहे.

गुगल मॅप लोकेशन )

या अभयारण्याच्या दक्षिण दिशेला वाशिम या तालुक्यातील ‘काटा’ या गावातील उगम पावलेली काटेपूर्णा नदी या अभयारण्याच्या मध्यभागातून वाहत जाते.

महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी १९८८ रोजी या अभयारण्याबाबत अधिसूचना जारी केली.

२० एप्रिल १९९६ मध्ये सदर सुरक्षित क्षेत्र व्यवस्थापनाकरिता अकोला वन विभागाकडून हस्तांतरित करण्यात आले आहे. संरक्षण व संवर्धन या गोष्टींचा विचार करता आश्रय स्थळांचा विकास आराखडा राबवण्यात येत आहे. या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात ‘ग्राम परिसर विकास योजना’ राबवण्यात येत आहे.

निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती

या अभयारण्यामध्ये कोल्हा, रानडुक्कर, तरस, रानमांजर, नीलगाय, माकड, वटवाघूळ आदी वन्यजीव आहेत. साग, धावडा, मोईन, बिबा, मोहा, आवळा, बेहडा, बेल अशा

प्रकारचे मोठे वृक्ष आहेत. आपटा, हिवर, पळस, लोखंडी, अमलतास अशा प्रकारची लहान झाडे आहेत.

या अभयारण्यातील वने दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पर्णगळी वने या प्रकारात मोडतात. आपल्याला जर या अभयारण्याचा निसर्ग पाहयचा असेल तर १ ऑक्टोबर ते १५ जून हा कालावधी यासाठी अगदी योग्य आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे

  • क्षेत्र : ५७.३२ चौ. कि.मी.
  • उंची : ३४० मीटर ते ४६७ मीटर (समुद्र सपाटीपासून)
  • हवामान : मार्च ते मे-उष्ण, जून ते ऑक्टोबर -मध्यम, नोव्हेंबर ते फेब्रुवारी-थंड
  • जवळचे बस स्थानक : अकोला, महान, मंगरुळपीर
  • जवळचे रेल्वे स्थानक : अकोला, बार्शीटाकळी
  • निवास व्यवस्था : १) वन विश्रामगृह -कासमार २) पाटबंधारे विश्रामगृह-महान
  • जवळचे विमानतळ : नागपूर
  • आरक्षणाकरिता संपर्क : उपवनसंरक्षक (वन्यजीव) – अकोला दूरध्वनी- (०७२४) – ४१६११३.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा