किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI

किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “किनवट अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

किनवट अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

किनवटचे अभयारण्य यवतमाळ व नांदेड या दोन वनविभागात आहे.

गुगल मॅप लोकेशन )

पैनगंगा नदी या भागातून वाहत असल्याने या अभयारण्याची शोभा वाढली आहे. या अभयारण्याने सुमारे ३२४ चौ. कि. मी. चे क्षेत्र व्यापले आहे. या अरण्यात जास्तीत जास्त भाग यवतमाळ मध्ये आहे.

नांदेड किनवट या बस मार्गाने १३० कि. मी. अंतर आहे. आपल्याला रेल्वेनेसुद्धा या ठिकाणी जाता येते. येथे असणाऱ्या निवास स्थानामुळे येणाऱ्या पर्यटकांची चांगली सोय झाली आहे.

निसर्ग व प्राणी संपत्ती

या ठिकाणी असलेल्या वनविभागामध्ये साग, सालई, हळद, कुलु, सावेरी, मोईन, ऐन हे वृक्ष दाटीने दिसून येतात. बाभूळ, खैर, जांभूळ, पळस, आकेशिया हेही वृक्ष आपल्याला पाहयला मिळतात.

किनवटच्या अभयारण्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, नीलगाय, चिंगरा, चितळ अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांचेही दर्शन घडते.

ज्याला निवांतपणा हवा आहे त्याने किनवटच्या वन विभागात जाऊन काही दिवस राहावे. सारा परिसर पायाखालून घालावा व निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटावा.

आपला राष्ट्रीय पक्षी मोर, कोकीळ, बुलबुल, मैना, पोपट, खंड्या, तांबट, सुतार, कोतवाल अशा प्रकारच्या विविध पक्षांनी या ठिकाणचा सारा परिसर जिवंत झाला आहे.

पक्षी निरीक्षण हा एक उत्तम छंद आहे. वाचन, टिपण, श्रवण या प्रकारे आपल्या ज्ञानात भर पडते व वेळही जातो. मार्च ते जून महिना या ठिकाणी भेट देण्यास योग्य काळ आहे.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा