कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI

कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI –

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही कोयना अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

कोयना अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्लयाच्या पायथ्याशी असलेले एक ठिकाण म्हणजे कोयना अभयारण्य होय. पुण्याहून महाबळेश्वरला जावे. तिथला सर्व परिसर अनुभवावा आणि मग महाबळेश्वर पासून एस. टी. ने तापोळा येथे जावे व तेथून लाँचने शिवसागर पार करून थेट इंदवली या गावास जावे.

गुगल मॅप लोकेशन )

या ठिकाणापासून कोयना अभयारण्याचा परिसर आपल्याला साद घालतो. आपल्याला पुणे-सातारा, सातारा- कास बामणोली असेही जाता येते. बामणोलीपासून लाँचने शिवसागर जलाशय पार केला की थेट इंदवलीस जाता येते. या ठिकाणातील निसर्ग खरोखरीच अनुभवण्यासारखा आहे.

ज्यांना गड, किल्ले अथवा भ्रमंतीची सवय आहे. निसर्गाची नव- नवी रूपे पाहयला, अनुभवायला आवडतात, त्यांनी जरूर या ठिकाणी भेट द्यावी. खरे तर जंगलाची सुद्धा एक भाषा असते. एक आशय असतो.

जंगलात जाण्यापूर्वी काही गोष्टींची व्यवस्थित माहिती गोळा केली तर आपला आनंद द्विगुणीत होतो.

निसर्ग संपत्ती

सुंदर डोंगरांनी वेढलेला परिसर, निरनिराळे लक्ष वेधून घेणारे वृक्ष, निरनिराळी फुलझाडे, वन्यपशू, पक्षी अशा प्रकारे समृद्ध असलेले ठिकाण म्हणजे कोयना अभयारण्य होय. निरनिराळ्या आकाराचे प्रचंड वृक्ष व निरनिराळ्या उपयोगी वनस्पती हे या ठिकाणाचे खरे सौंदर्य आहे. असे मला वाटते.

निरनिराळ्या अभयारण्य स्थापनेमुळे तसेच काही निसर्ग प्रेमी व शासनाची योग्य आखणी, व्यवस्था अशा प्रमुख कारणांमुळे जंगलातील बन्यपशूंना दिलासा मिळाला. वन्यपशंची शिकार थांबली, त्यांच्या कातडीची विक्री थांबली, चोरीचे प्रकार थांबले. आता निसर्गप्रेमी, पर्यटक शांतपणे अभयारण्यात फिरू शकतात. निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.

प्राणी संपत्ती

आपल्याला या ठिकाणी अस्वल, हरिण, कोल्हा, लांडगा, गवा वाघ, सिंह अशा प्रकारचे बन्यपशू तसेच खंड्या, बुलबुल, धनेश, पोपट, घार, सूर्यपक्षी, कोतवाल असे पक्षी तसेच दगडफूल, तमालपत्र, दालचिनी, लवंग, कडिलिंब अशी उपयोगी वनस्पती व फळझाडे आपल्याला या ठिकाणी पाहयला मिळतात.

लांडगा

लांडगा हा प्राणी महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, नगर, बीड, सोलापूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी आढळतो. या प्राण्यास राहण्यास हिरवीगार व पानझडी वृक्षांची दाट अरण्ये आवडतात.लांडगा कधीही आपली शिकार शोधण्यास बाहेर पडतो. हरिण, सांबर, विविध पक्षी, जनावरे इ. तो खातो.

पूर्ण बाढलेला लांडगा उंचीला साधारण ६० ते ७५ सें.मी. असतो. त्याची लांबी डोके व शरीर मिळून सुमारे ९० ते १०५ सें. मी. व शेपटी सुमारे ३५ ते ४० सें. मी. असते. महाराष्ट्रात दिसून येणाऱ्या लांडग्याची सरासरी २० ते ३० कि. ग्रॅम असल्याचे दिसून येते. त्यामानाने उत्तर हिंदुस्थानात व हिमालयाच्या पायथ्याला दिसून येणाऱ्या लांडग्याची प्रकृती जास्त उत्तम असते.

महाराष्ट्रात साधारण पावसाळ्याच्या शेवटास लांडग्याच्या माद्या गाभण राहिल्याचे व डिसेंबरास जन्मास आल्याचे साधारणतः दिसून येते. मादी एका वेळेस तीन ते नऊ पिलांना जन्म देते. याचे आयुष्य १२ ते १५ वर्षे असल्याचे आढळून आले.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा