फुलांचे मनोगत मराठी निबंध | LILY FLOWER INFORMATION IN MARATHI

फुलांचे मनोगत मराठी निबंध | LILY FLOWER INFORMATION IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “फुलांचे मनोगत मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये LILY FLOWER INFORMATION IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • फळांचा मोसम, पाखरांचा वावर
  • रंगांचे वैविध्य
  • वर्षभर बहरणारी घाणेरी
  • कुंपणाची शोभा वाढवणे
  • मखर, आरास करण्यासाठी उपयोग
  • गुच्छांची काळजी घेण्याची अपेक्षा
  • लिलीची खंत

फुलांचे मनोगत मराठी निबंध | LILY FLOWER INFORMATION IN MARATHI

ए मुली, माझ्यावरचे फुलांचे गुच्छ तुला हवेत ना? मग फक्त गुच्छच अलगदपणे तोड. माझी अख्खी डहाळी ओढू नको. माझ्या फांदया दुखतात बरं! आणि माझे काही गुच्छ शिल्लक ठेव. फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या सगळे माझ्या गुच्छांवर भिरभिरत असतात. मला खूप आनंद होतो आणि रंगीबेरंगी तुऱ्यांमुळे कुंपणही शोभिवंत दिसते. तेव्हा सगळे गुच्छ ओरबाडू नकोस.

सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. त्यामुळे तुझ्यासारख्या काही जणी येतात. गणपतीच्या मखराची आरास करण्यासाठी आमचे रंगीबेरंगी गुच्छ घेऊन जातात. खरं तर याच काही दिवसांत आम्ही थोडे मिरवून घेतो.

पावसाळा संपला की आमच्या फुलांचे गुच्छ कमी होतात. त्यानंतर फळांचा मोसम येतो. गुंजेच्या आकाराची हिरवी, काळी फळे झाडावर दिसायला लागतात. एरवी उग्र वासाची फुले म्हणून आम्हांला ‘घाणेरी ‘च म्हणतात. पण फळे खाण्यासाठी पक्षी आणि कीटक मात्र येत असतात. हे प्राणी आमच्या जगण्याला बळ देत असतात.

एरवी आम्ही उग्रगंधी! आम्हाला कोणी केसात माळत नाहीत की देवाला अर्पण करीत नाहीत. पण आमच्याकडे जरा नीट निरखून पाहिले तर रंगांचे (दुरंगी) वैविध्य तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रात आमचे स्थान शेताच्या बांधावर किंवा कुंपणावर असते. गुजरातमध्ये आमच्या रंगीबेरंगी फुलांना ‘चुनरी’ (दुपट्टा) म्हणतात. आमच्या रंगांशी मिळतेजुळते रंग त्यांच्या चनरीवर पाहायला मिळतात.

सदाफुलीसारखे आम्ही वर्षभर फुलतो म्हणून आमचे बोन्साय केले जाते. त्यामुळे काहीजणांच्या दिवाणखान्यातही आम्ही साजतो.

आम्ही इतर फुलांसारखी नित्य वापरातली फुले नाहीत. आम्हांला बाजारात विक्रीसाठी कोणी पाठवत नाही. आमची खास लागवडही केली जात नाही; की कोणी आमचे खास संवर्धन करीत नाही. परंतु आम्ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा एक भाग आहोत, त्यामुळे खूप आनंदी आहोत. यामुळेच वर्षभर आमचे रंगीबेरंगी गुच्छ बहरत असतात.

हे निबंध सुद्धा वाचा –