लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI

लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “लिंगाणा किल्ल्याची माहिती” म्हणजेच “LINGANA FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

लिंगाणा किल्ल्याची माहिती व ठिकाण

तोरणा आणि रायगड दोन्ही किल्ल्यांच्यामधे सह्याद्रीच्या एका फाट्यावर शिवलिंगासारखा उभा सुळका असलेला लिंगाणा किल्ला रायगडावर नजर ठेवून उभा आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाणे नावाच्या गावापासून मूळ किल्ल्याचा चढाव सुमारे ६ कि.मी. असावा. तळामध्ये लिंगणमाची नामक लहानसे गाव आहे. ( गुगल मॅप )

किल्ल्याची वाट या लिंगण माचीतून जाते.

लिंगाणा किल्ल्याची माहिती व रचना

सर्व साधारण विचार करता किल्ल्याचा चढ अतिशय अवघड आहे.

यापूर्वी गडावर जाण्याकरिता पायऱ्या कोरलेल्या होत्या, पण आता म्हणाल तर त्या होत्या का नव्हत्या अशा अवस्थेत आहेत.

आपण शिडीने चढू शकतो. वरती गेल्यावर आपण पाहिले तर आडवाटेत पाण्याची टाकी तसेच कैद्यांकरिता वापरात येणारी जागा आपणास आढळते.

याच गुहेच्या प्रचंड अशा माथ्यावरील भला मोठा सुळका अजय मानला जाई.

१९७९ मुंबई, १९८० पुणे, १९८३ पुणे गिर्यारोहकांनी या अवघड सुळक्यावर चढण्यात यश संपादन केले.

हा सुळका अतिशय अवघड आहे. येथे जायचे म्हणजे व्यवस्थित सर्व गोष्टींचा विचार करूनच जावे लागते.

योग्य सराव असेल तरच तेथे जावे अन्यथा नको.

आपल्या लिंगाणाकडून रायगड किल्ला, तळातील काळ नदी व आजुबाजूचे प्रचंड कड्यांचे दर्शन घडते.

ऐतिहासिक निर्देश

काही काळपर्यंतहा किल्ला रायगड किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापरला गेला.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा