लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI

लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही लोहगड किल्ल्याची माहिती म्हणजेच LOHAGAD INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

लोहगड किल्ल्याची माहिती व ठिकाण

आपण पुण्याहून मळवली स्टेशनला उतरलो की आपल्याला जवळच लोहगड आणि विसापूर हे दोन किल्ले दिसतात. पलीकडे तुंग आणि तिकोणा असे आणखी दोन किल्ले आपल्याला दिसतात. ( गुगल मॅप )

या चारही गडांमध्ये लोहगड हा चांगला भक्कम, अजोड असा गड होय. गडाची उंची समुद्रसपाटीपासून १०२४ मी. आहे. पूर्वपिक्षा अलीकडे झाडांची संख्या कमी आहे.

आहे तेवढीसुध्दा झाडी बरीच आहे असे तेथील गारव्यामुळे म्हणावेसे वाटते. गडावर भरपूर प्रमाणात वारा आहे.

लोहगड किल्ल्याची रचना व ऐतिहासिक निर्देश

गडाची रचना दोन हजार वर्षांपूर्वीची असावी. सातवाहन, चालुक्य इत्यादी राजवटी लोहगडाने पाहिलेल्या आहेत.

निजामशाहीच्या स्थापनेनंतर १४६४ मध्ये लोहगडावर दुसरा बुन्हाणशहा कैदेमध्ये होता. इ.स. १६४८ मध्ये शिवाजीराजांनी लोहगड हा भक्कम गड जिंकला.

हा जिंकलेला गड काही काळानंतर जयसिंगाच्या तहाच्या वेळी मोगलांस परत द्यावा लागला. इ. स. १६७० मध्ये पुन्हा लोहगड मराठ्यांकडे आला.

लोहगड किल्ल्यावरील स्थळे

हा गड पाहण्याकरिता एक दिवसही पुरतो. सकाळी निघून मळवली स्टेशनला उतरावे आणि गडाच्या मार्ग गडावर जावे.

फेरफटका मारून आपले संध्याकाळच्या लोकलने पुण्यास परतावे. गड चांगला आहे. लोहगडावरून आपल्याला बराच चांगला देखावा पाहायला मिळतो.

उदा. डोंगरीच्या पसरलेल्या रांगा, तुंग, तिकोना, विसापूर, माथेरान, प्रतापगड इत्यादी परिसर दिसतो.

निसर्गाचा काही वेळेस हेवा वाटावा इतके सुंदर दृश्य दिसते.पुणे-मळवलीला आपण पोचलो की, दक्षिण दिशेला लोहगड आहे.

डाव्या हाताला विसापूर व उजवे हाताला लोहगड आहे.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा