माळढोक पक्षी अभयारण्य माहिती | MALDHOK PAKSHI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI

माळढोक पक्षी अभयारण्य माहिती | MALDHOK PAKSHI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही माळढोक पक्षी अभयारण्य माहिती” म्हणजेच MALDHOK PAKSHI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

माळढोक पक्षी अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

माळढोक पक्षी अभयारण्य पाहयला पुणे ते सोलापूर असा प्रवास करून पुढे २० किलो मीटर अंतरावर नान्नज या ठिकाणी ‘माळढोक’ या रुबाबदार पक्ष्याचे अभयारण्य लागते.

गुगल मॅप लोकेशन )

एके काळी हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर होता. १९७१ मध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये मोहोळ, माढा, करमाळा जिल्हा सोलापूर व कर्जत, श्रीगोंदा, नेवासे जिल्हा अहमदनगर या तालुक्यांच्या वनक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

या अभयारण्याच्या स्थापनेनंतर माळढोक पक्ष्याची शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. माळढोक हा डौलदार पक्षी आहे. नराची उंची ३ फूट असते व मादीची उंची २ फूट असते. माळढोक पक्ष्यात मादीपेक्षा नर अधिक चांगला दिसतो. नराची पाठ व पंखाचा रंग काळसर करडा असतो. मादीचा रंग थोड़ा फिकट असतो.

नराची चोच टोकदार असते. या पक्ष्याचे पाय १ फूट उंच असतात. याच्या पायाला तीन बोटे असतात. माळढोक पक्ष्याच्या बोटांना धारदार नखे नसल्यामुळे त्याला झाडावर बसता येत नाही.

या पक्ष्याला काटेरी झुडपांचे माळरान राहयला आवडते. याचा रंग

माळरानाशी मिळता जुळता असल्याने त्याच्या संरक्षणास मदत होते. या पक्ष्याच्या खाद्याचा विचार करता हा पिकावरील कोवळे तुरे, लहान आकाराची फळे, निरनिराळे धान्य उदा. – ज्वारी, बाजरी, करडी, सूर्यफूल तसेच निरनिराळे कीटक व अळ्या खातो.

हा पक्षी सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस आपले खाद्य शोधत असतो. दुपारचे वेळेस मात्र हा विश्रांती घेतो, हा एक जागृत पक्षी आहे.

त्याला आपल्या शत्रूची चाहूल लगेचच लागते. एका वेळेस १० ते १५ पक्षी एकत्र असतात.

हा पक्षी ‘क टुकड’ असा आवाज करतो. या पक्ष्यास हिंदीमध्ये ‘टुकना’ असे म्हणतात. संस्कृतमध्ये या पक्ष्यास ‘महासारंग’ म्हणतात. माळढोक पक्ष्याच्या एकूण २२ जाती आहेत.

तीन उपजाती भारतात आढळतात. हा पक्षी सारंग काळात मोडतो. माळढोक पक्षी अभयारण्यात आपण फिरल्यावर अनेक गोष्टींचे ज्ञान घोड्याश्या प्रमाणात होते.

जंगलातील वैभवास सखोल अभ्यास लागतो.

निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती

पुढील अनेक प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे याचे दर्शन घडते.

प्राणी – कोल्हा, लांडगा, तरस, साळिंदर, मुंगूस, ससा, खोकड,

चिंकारा इत्यादी.

पक्षी – तांबट, सुगरण, खंड्या, पारवा , चंडोल, बुलबुल, करकोचा, मुनिया, तितर, मैना, मोर इत्यादी.

झाडे बाभुळ, खैर, लिंब, शिरस, बोर, अंजन, चंदन, आपटा इत्यादी. अशा प्रकारच्या एक ना अनेक गोष्टी पाहयच्या असतील तर सरळ एके दिवशी नान्नज येथील अभयारण्यास भेट द्यावी.

निसर्गात भरपूर हिंडावे व तेथील आनंद लुटावा.

ठिपक्याचे हरिण

ठिपके असलेले हरिण हा प्राणी सर्वांच्या परिचयाचा आहे. सर्व भारतभर हा प्राणी दिसून येतो. मध्य प्रदेश व हिमालय या ठिकाणी असणारी हरणे प्रकृतीने उत्तम असतात. सर्व जातीच्या हरिणामध्ये, या प्राण्यात ठिपके असलेले हरिण दिसावयास सुंदर व आकर्षक असते.

या प्राण्याच्या पाठीचा रंग तांबूस असतो व त्यावर पांढरे ठिपके असतात. याच्या कपाळाचा रंग देखील तांबूस असतो.

ह्या हरिणांच्या शिंगास सांबराप्रमाणे डोक्याजवळच दोन फाटे फुटलेले असतात. परंतु हे सांबर या प्राण्याप्रमाणे कपाळावर नसून दोन्ही बाजूस म्हणजे कानापाशी दोन फाटे एकमेकांशी काटकोन करून फुटलेले असतात.

माद्यांना शिंगे नसतात. पंजाब व राजस्थान हे भाग सोडले तर जवळजवळ भारतभर ही

हरणे आपल्याला दिसतात. एकेका कळपात साधारण १८ ते ३० हरणे असतात.

हरिण हा प्राणी सांबाराप्रमाणे निशाचर नसतो. हरिण हा प्राणी चरताना फक्त दुपारच्या वेळेस विश्रांती घेतो.

विविध प्रदेशात विविध वेळी शिंगे गळून पडतात. मध्य प्रदेश व दक्षिण भारतात ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान शिंगे गळून पडतात. आपल्या येथे हरिणांचा समागमाचा काळ एप्रिल ते मे असतो.

नरांमध्ये मादीवरून भांडणे होतात. गर्भधारणेचा काळ ८ महिने असतो. मादी एका वेळेस एकाच पिलाला जन्म देते. हरिणाचे मांस खायला चांगले असते.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा