झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | MARATHI ESSAY ON TREE JHADE LAVA JHADE JAGVA NIBANDH

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | MARATHI ESSAY ON TREE JHADE LAVA JHADE JAGVA NIBANDH | TREE ESSAY IN MARATHI LANGUAGE – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये MARATHI ESSAY ON TREE JHADE LAVA JHADE JAGVA NIBANDH यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • झाडांचे महत्त्व
  • पिढ्यान्पिढ्या होत असलेली चूक
  • उजाड देश
  • पाऊस कमी
  • भूगर्भातील पाण्याची पातळी खाली
  • पर्यावरणाचा तोल हरवला
  • आपली चूक उमगली
  • विविध कारणांनी झाडे लावायची, जोपासायची, वाढवायची
  • वृक्षतोड थांबवली
  • तरच देश सस्यश्यामल होईल

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | MARATHI ESSAY ON TREE JHADE LAVA JHADE JAGVA NIBANDH

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | MARATHI ESSAY ON TREE JHADE LAVA JHADE JAGVA NIBANDH | TREE ESSAY IN MARATHI LANGUAGE

एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता.

अतिशय आवडली मला ही कल्पना, आज एवढ्या घरातून नक्की झाडे लावली जातील आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून ती जोपासली जातील. आजच्या काळाची ती एक नितांत गरज आहे.

माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क? कुणाची मालकी? कुणाचीही नाही: म्हणजे सर्वांचीच. शहरे फुगत चालली तसतशा मोठ्या इमारतींची आवश्यकता निर्माण झाली.

वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड… पुस्तक, ग्रंथ, कचेर्‍यांतील कामांसाठी कागद; त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावांतील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच. मग झाडे तोडली जातात.

शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडी मुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले, की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे!

झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे.

मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वत:ला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. आता कुणी झाड तोड़ू लागला की चार जण घालून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत.

प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षरोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. घरात बाळ आले, झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी ‘ स्मृतिवना ‘त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत.

जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावून करायचे आहे. अगदी खेडोपाडी, समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा –