मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI

मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही मायणी अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

मायणी अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

निसर्गाच्या अनुकूल परिस्थितीमुळे मायणी पक्षी अभयारण्याचा जन्म झाला असे म्हणावे लागेल. सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील मायणी गावाजवळ कानकाया नावाच्या प्रचंड नाल्यावर बांध घालण्यात आला. यातूनच इथल्या तलावाचा जन्म झाला.

गुगल मॅप लोकेशन )

मायणी पक्षी अभयारण्याच्या स्थापनेच्या अगोदरचा विचार करता कालांतराने पाणथळीचा परिसर निर्माण झाला. आजूबाजूचे डोंगर, तलावाचा परिसर, चिखलाचे प्रमाण अशा विविध गोष्टींमुळे साहजिकच या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी येऊ लागले.

दिवसेंदिवस या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढू लागली. याचा परिणाम असा झाला की साहजिक पक्ष्यांच्या रक्षणाची गरज भासू लागली.

दिनांक ११ मार्च १९८७ रोजी मायणी पक्षी अभयारण्याची स्थापना करण्यात आली. या अभयारण्याची एकुण प्रदेश १०८० एकर एवढा आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक व पक्षी मित्र येतात व या ठिकाणी निसर्गाचा अनुभव घेतात. पक्षी हे। माणसाचे मित्र आहेत.

तसे ते शेतकऱ्यांचे ही मित्र आहेत. पक्ष्यांमुळे शेतक-्याच्या शेतातील पिकांचे रक्षण होते. निसर्गाचा समतोल राखण्यास पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर मदत होते.

मायणीस प्रेंडस् ऑफ नेचर नावाची संस्था आहे. १९८३ पासून ही संस्था पक्ष्यांच्या रक्षणार्थ कार्य करीत आहे. आज अशा प्रकारे काम करणाऱ्या संस्थांची खन्या अर्थाने मदत होते. पक्ष्यांबद्दल विविध प्रकारच्या नोंदी ठेवण्याचे महत्त्वाचे काम ही संस्था करते.

निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती

या ठिकाणातील तलावावर ८५ प्रकारचे सुमारे २० ते २५ हजार पक्षी आल्याची नोंद आहे. युरोप, सैबेरीया, तिबेट, लडाख तसेच हिमालय मधून हे पक्षी आपली हजेरी लावतात.

विविध प्रकारची झाडे, विविध जातीचे, प्रकाराचे पक्षी, वनस्पती, जलचर प्राणी, बन्यपशू या ठिकाणी आहेत. पुणे ते सातारा व सातारा तं

भाषणी असा प्रवास आहे. साताऱ्यापासून मायणी ८० कि. मी. आहे. सातारा विभाग या करिता विशेष परिश्रम घेत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

हनुमान वानर

हनुमान वानर अथवा काळ्या तोंडाचे वानर महाराष्ट्रात जवळजवळ सर्व ठिकाणी आढळते. ही वानरे नेहमी फिरताना कळपाने फिरतात. १५ ते २० जणांचा एक कळप असतो.

वानर सकाळीच आपले खाद्य शोधावयास बाहेर पडतात. दुपारच्या वेळेस पाण्याच्या जवळ अथवा सावलीत विश्रांती घेतात. कित्येक वेळेस वानरे व माकडे एकत्रही फिरतात. रात्र झाली की मात्र आपल्या ठराविक ठिकाणी मुक्कामास जातात.

आपल्या संरक्षणार्थ ही वानरे अथवा माकडे झाडाच्या टोकास मोठ्या फांदीवर जाऊन बसतात. रात्री वाघ ज्यावेळेस बाहेर पडतो. त्यावेळेस कधी कधी वानरे अथवा माकडे यांचा पाठलाग करतात.

बिबळ्या वाघाला वानराचे अथवा माकडाचे मांस खावयाला फार आवडते. या भितीच्या पोटी वानर अथवा माकड उंच झाडावर फांदीच्या टोकास बसते.

बिबट्या वाघ फांदीच्या टोकापर्यंत सहसा जात नाही, याचे कारण त्याचे धिप्पाड शरीर. फांदीला वाघाचे वजन पेलत नाही. फांदी मोडण्याची शक्यता असते.

वानर व माकडयातील प्रमुख फरक असा की वानरांच्या शेपट्या माकडांपेक्षा लांब असतात.

माकड हे बुटके असते व जाडजूड असते. बानराची शरीराची रचना लांब, उंच व सुटसुटीत असते.

वानर जमिनीवर बसले असता त्याची उंची ६० ते ७५ से, मी. भरते. त्याची शेपूट ९० ते १०५ से. मी. भरते वानर हा प्राणी पूर्ण शाकाहारी आहे.

वानराचे खाद्य म्हणजे रानटी फळे, झाडांची मुळे, पाने, फुले, केळी इत्यादी होय.

वानरांचा गर्भधारणेचा काळ साधारण ९ महिने असतो. जानेवारी ते मार्चमध्ये पिलांचा जन्म होतो.

अमरावती, चंद्रपूर, विदर्भ, भंडारा या भागात वानरे मोठ्या संख्येने असतात.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा