मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI

मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “मेळघाट अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

मेळघाट अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

मेळघाट अमरावती जिल्ह्यात असून येथील डोंगराळ प्रदेश निसर्गसौंदर्य संपन्न अशा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.

हा भाग सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागात मोडतो.

ह्या अभयारण्यातील अतिसंरक्षित भाग ३०१.०५ चौ. कि. मी. असून उर्वरीत भाग १,२७०.६९ चौ. कि. मी. इतका आहे.

म्हणजेच त्याचे एकूण क्षेत्रफळ १,५७१.७४ चौ. कि. मी. इतके आहे.

गुगल मॅप लोकेशन )

मेळघाटमधील उंची जास्तीत-जास्त १,१७७.७५ मीटर्स एवढी आहे या ठिकाणी सिपना, खडू, खापरा, डालार व गडगा अश्या पाच लहान नद्या आहेत.

मेळघाटमधील अरण्ये ही दक्षिणेकडील उष्ण प्रदेशातील शुष्क प्रवातीमिश्र वनांच्या प्रकारामध्ये मोडतात.

अमरावती बऱ्हाणपूर ह्या मार्गावर अमरावतीपासून ११४ कि. मी. अंतरावर वसले आहे.

या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या संरक्षणाखेरीज जंगली फळझाडांची लागवड करणे, गवताचे व वन्य पशूंना उपयुक्त अशा झुडपांचे उत्पादन वाढविणे अशा प्रकारे हे कामही चालते.

निसर्ग व प्राणी संपत्ती

या अरण्यामध्ये पट्टाईत वाघांच्या व्यतिरिक्त बिबळे, अस्वल, जंगली कुत्रा, सांबर, गवा, भेकर, नीलगाय रानडुक्कर, चौशींगा, ठिपके असलेली हरणे हे प्राणी मुख्यतः आढळतात.

मेळघाट अभयारण्यामधील अतिसंरक्षित भाग म्हणजे ‘कोलकाज’, ‘कुला’, या शब्दाचा अपभ्रंश होऊन कोल व त्यावरून कोलकाज हे नाव पुढे रूढ झाले.

मेळघाट ठिकाणचा वाघांकरता वसलेला प्रकल्प उत्तम आहे.

पूर्णपणे संरक्षणाकरता वेळोवेळी वाहनांची गस्त, बिनतारी संदेश यंत्रणा, मोठ्या आकाराचा निरीक्षण मनोरा अशा गोष्टींचा वापर करण्यात येतो.

पट्टेवाला वाघ ( टायगर )

वाघ म्हटले म्हणजे एक ताकदवान, मोठ्या आकाराचा प्राणी आपल्या डोळ्यासमोर येतो. हा आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी होय. सर्वसामान्य

पर्यटकांना याचे दर्शन मोठ्या बागांमधून व्यवस्थित होते. या प्राण्याला आपण बराच वेळ पाहू शकतो.हा प्राणी जंगलचा राजा म्हणून ओळखला जातो.

जंगलामध्ये आढळून येणाऱ्या वाघाच्या आठ उपजाती आहेत.

वाघाला फिरायला व राहयला हिरवीगार दाट जंगले आवडतात. वाघाला हरणे, सांबर अशा प्राण्यांचे खाद्य मिळेल, पाण्याची उत्तम सोय असेल व विश्रांतीकरिता थंड ठिकाण असेल अशी जागा तो पसंत करतो.

पूर्ण वाढलेला नर वाघ सुमारे तीन मीटर्स (९ ते ९ ।। फूट ) लांब असतो. कधी कधी १० ते १२ फूटापर्यंत लांबी भरू शकते. नराचे वजन साधारण १८० ते २३० किलो पर्यंत असू शकते.

मादीची लांबी साधारण ८ ॥ फूटापर्यंत असते. हिमालयामध्ये व उत्तर भारतात असणाऱ्या वाघांची लांबी व वजन मध्य व दक्षिण भारतातील वाघा पेक्षा जास्त असते.

आपल्या येथील वाघांच्या अंगावर ठसठशीत पट्टे असतात. त्याच्या अंगावर बारीक केस असतात.भारतात वाघाच्या समागमाचा काळसाधारण पावसाळ्यानंतर असतो.

समागमानंतर मादी गाभण राहून तिला पिले झाल्यावर नर बाघ मादी बरोबर असतोच असे नाही. फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान मादीस पिले होतात.

मादीच्या गर्भधारणेचा काळ सुमारे १५ ते १६ आठवडे असतो. एकावेळी मादी २ ते ३ बच्चांना जन्म देते.

पिले लहान असताना मादी आपल्या पिल्लांचे संगोपन उत्तमरीतीने करते.

पिले सहा महिन्यानंतर आपल्या आईबरोबर शिकारीस बाहेर पडतात पिले साधारण दोन वर्षाच्या काळात आपल्या आईच्या मदतीने शिकारीत तरबेज होतात. वाघाचे आयुष्य ३० वर्षापर्यंत असू शकते.

वाघाचे शरीर लांब व वजनदार असले तरी हा एक चपळ प्राणी आहे. हा पाण्यात उत्तम प्रकारे पोह शकतो. वेळप्रसंगी हा झाडावरही चढ़ शकतो.

वाघ हा प्राणी संध्याकाळ झाली की आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतो. याला हरण, सांबर, गवा, रानडुक्कर, अस्वल, गाय, म्हैस हे प्राणी खाद्य म्हणून चालतात.

एखादे दिवशी त्याला शिकार नाही मिळाली तर कोंबड्या व मासेसुद्धा खातो. कधी कधी रानातील चरावयास आलेल्या गाई, म्हशींचीसुद्धा शिकार करतो.

पर्यटन

या ठिकाणी असलेल्या विविध जातीच्या पक्ष्यांनी इथला परिसर जिवंत ठेवला आहे. पक्ष्याचे सौंदर्य, त्यांचे आकार, त्यांचे आवाज त्यांच्या सवयी आपण भरपूर वेळ देऊन पाहिल्या तर आपल्याला बरेच काही शिकायला मिळते.

विविध ठिकाणच्या पर्यटनाने ज्ञानात भर पडते. या ठिकाणी राहवयाची उत्तम सोय आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ येथील निसर्ग सौंद्यांक उत्तम होय.

येथील प्राणी पाहयचे असतील तर मार्च ते जून या महिन्यात जाव आयुष्यात एकदा तरी मेळघाट अभयारण्याला भेट द्यायला हवीच.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा