मी माझ्या देशाचा नागरिक मराठी निबंध | MI MAZYA DESHACHA NAGRIK NIBANDH IN MARATHI

मी माझ्या देशाचा नागरिक मराठी निबंध | MI MAZYA DESHACHA NAGRIK NIBANDH IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मी माझ्या देशाचा नागरिक मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये MI MAZYA DESHACHA NAGRIK NIBANDH IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • देशप्रेम व राष्ट्रीयत्व यांची जाणीव
  • जबाबदार नागरिक
  • पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा संदर्भ
  • हक्क व कर्तव्ये यांची जाणीव
  • देशाच्या सद्य:स्थितीचे ज्ञान
  • देश माझा, मी देशाचा ही भावना
  • स्ववर्तन

मी माझ्या देशाचा नागरिक मराठी निबंध | MI MAZYA DESHACHA NAGRIK NIBANDH IN MARATHI

मी माझ्या देशाचा नागरिक मराठी निबंध | MI MAZYA DESHACHA NAGRIK NIBANDH IN MARATHI

रेल्वेच्या कडेने प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांचा नेहमी खच पडलेला असतो. रस्त्याच्या कडेला असलेली कचऱ्याची पिंपे कचऱ्याने ओसंडून वाहत असतात. लोक कुठेही धुंकतात. घरातील कचरा रस्त्यावर आणून टीकतात. गाड्या कुठेही उभ्या करतात.

वाहने प्रवास करण्यासाठी नसून, इतर वाहनांशी स्पर्धा करण्यासाठी असतात, असा सर्वांचा समज झालेला आहे. दुचाकीवाले तर त्यांच्यासाठी कोणताच नियम नाही, असेच मानत असतात. ‘गोष्ट अरुणिमाची‘ या पाठातील अरुणिमा रेल्वे रुळांवर अर्धमेल्या अवस्थेत रात्रभर विव्हळत पडली होती. पण तिला कोणीही मदत केली नाही.

काय म्हणायचे याला? कोणालाही कोणाचीही पर्वा वाटेनाशी झाली आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल का, असा विचार जरासुद्धा मनात येत नाही. मग आपण खरोखरच देशाचे जबाबदार नागरिक झालो आहोत का ? असेच जर प्रत्येक जण वागू लागला, तर देश कोसळायला वेळच लागणार नाही.

आम्ही जबाबदार नागरिक व्हायचे म्हणजे काय करायचे ? हे समजून घेण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा आपण प्रामाणिकपणे पाळली तर नक्कीच उत्तम नागरिक होऊ शकतो. काय सांगते ती प्रतिज्ञा? आपण सगळ्यांशी सौजन्याने वागले पाहिजे.

वडीलधाऱ्यांचा मान राखला पाहिजे. देशबांधवांच्या कल्याणासाठी झटले पाहिजे. काय सुचवते ही प्रतिज्ञा? आपण सौजन्याने वागायचे ते केवळ दुसऱ्यांना बरे वाटावे म्हणून नको.

या सौजन्यातून आपण दसऱ्यांच्या भावभावनांचा, त्यांच्या इच्छा-आकांक्षांचा आपण मान राखतो शब्दांत हेच असे सांगता येईल की, इतरांना स्वत:चे जीवन जसे जगायचे असेल, तसेच सन्मानाने जगण्यासाठी आपण मदत करतो. इथल्या भौगोलिक विविधतेवर प्रेम करणे म्हणजे ती विविधता मान्य करणे आणि त्यातूनच जीवन जगण्याचे मार्ग शोधणे होय.

आपल्या घटनेने आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले आहे. हे स्वातंत्र्य आपण मनापासून उपभोगावे. पण दूसर्यांनाही तसेच स्वातंत्र आहे, हे लक्षात ठेवावे. स्वत:चे हक्क जगता जगता इतरांच्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये. यासाठी आपण काय केले पाहिजे?

आपण सर्व प्रकारची समानता पाळली पाहिजे. जात, धर्म, भाषा, लिंग, प्रदेश यांवरुन भेदभाव करता कामा नये. त्यांना समान संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण झटले पाहिजे. आपले सामाजिक वास्तव आपण नीट समजून घेतले पाहिजे. असे असूनही आपण स्त्रियांना समान हक्क दिलेले नाहीत.

तसेच, शहरात सर्व सुखसोयी असतात. चोवीस तास वीज उपलब्ध असते. त्याच वेळी ग्रामीण भागात १०-१०, १५-१५ तास लोडशेडिंग असते. रेशनिंगचे धान्य सुद्धा पुरेसे व वेळेवर मिळत नाही. पिके हाताशी आली की, व्यापारी भाव पाडतात. हे सगळे थांबले पाहिजे. तरच सर्वांना समान संघी मिळेल.

हा देश माझा आहे, मी देशाचा आहे; अशी भावना बाळगून आपण वागले पाहिजे. सर्वप्रथम हे पाहिले पाहिजे की, अन्य कोणीही तसे वागो न वागो, मी मात्र तसेच वागणार, असा ठाम निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. मग देशाची उन्नती दूर राहणार नाही.

यूट्यूब व्हिडिओ

हे निबंध सुद्धा वाचा –