मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | MOBILE SHAP KI VARDAN MARATHI NIBANDH

मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | MOBILE SHAP KI VARDAN MARATHI NIBANDH | MOBILE CHE DUSHPARINAM IN MARATHI NIBANDH | MOBILE ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये मोबाईल नस्तातर काय झाले असते मराठी निबंध, मोबाइल चे दुष्परिणाम मराठी निबंध, MOBILE SHAP KI VARDAN MARATHI NIBANDH | mobile essay in marathi यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • मोबाइलवर होणारे आरोप
  • वाहन चालवताना घ्यायची काळजी
  • बातम्यांची सत्यता तपासणे
  • मोबाइलची लोकप्रियता
  • माहिती मिळवणे व माहिती पाठवण्यासाठी उपयोग
  • मोबाइलचा सुयोग्य वापर

मोबाइल शाप की वरदान मराठी निबंध | MOBILE SHAP KI VARDAN MARATHI NIBANDH

MOBILE CHE DUSHPARINAM IN MARATHI NIBANDH | MOBILE ESSAY IN MARATHI

हॅलो, हॅलो ! मी मोबाइल बोलतोय मी तुमचा लाडका मोबाइल ! आज मी काहीसा खट्टु झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप व्हायचे. मी मुलांना बिघडवतोय. थोरांना नादाला लावतोय. उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते.

तसं पाहिलं, तर काही अंशी ते खरेच होते. मुलं अभ्यास किंवा महत्त्वाची कामं सोडून माझ्याशी खेळत बसायचे. मोठी माणसे माझा दुरुपयोग करत होती. तासनतास गप्पा मारणे, निरर्थक एसेमेस पाठवणे हे सरांस चाले.

माझ्यावर आलेल्या माहितीची सत्यता तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. लगेच माहिती दुसर्यांना पाठवतात. त्यामुळे अफवा पसरतात. काही ठिकाणी तर यांमुळे तंटे उभे राहिले आहेत.

रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना माझ्या साहाय्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत. मला कानाशी लावून रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रुळ ओलांडताना काहीजणांनी प्राण गमावले आहेत. काहीजणांनी अनेकांची बेअब्रू करण्यासाठी माझा वापर केला आहे. या सर्व बाबींमुळे माझी बदनामी खूप झाली.

मित्रांनो, माझे किती उपयोग सांगू ? अनेकांनी व्यवसायासाठी, राजकीय व सामाजिक प्रचारासाठी फेसबुकचा उत्तम उपयोग केला आहे. काही मोठे गुन्हे फेसबुकमुळे उघडकीला आले आहेत.

फेसबुकप्रमाणे यू-ट्यूब, टम्बलर, पिंट्रेस्ट, लिंक्डइन यांसारख्या संकेतस्थळांचा वापरही उपयोगी उरला आहे. आता तर ‘व्हॉट्सॲप‘ हे ॲप्लिकेशन खूपच लोकप्रिय होत चालले आहे.

माझ्यामुळे तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वत:च जतन करू शकता, पाठवू शकता. इतकेच नव्हे, तर स्वत:च स्वत:चा चित्रपट तयार करू शकता. नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वत:च कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता.

विदयार्थ्यांना विविध शैक्षणिक सूचना, निकाल, प्रबोधनपर माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो. परंतु माझ्या अतिप्रभावाखाली राहू नका. आवश्यक तेव्हाच माझा उपयोग करा.

तुम्हाला माहीत आहे का ? मी तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो. हॉटेले, दुकाने यांना तर बिलांचे पैसे दयायला मदत होतेच. पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे दयायलाही माझी मदत होऊ शकते. आता माझ्यामुळे तुमची बँक तुमच्या खिशात असेल.

मित्रांनो, खरं तर यावर मी तासन्तास बोलू शकतो. पण आज एवढंच पुरे !

MOBILE CHE DUSHPARINAM IN MARATHI NIBANDH | MOBILE ESSAY IN MARATHI यानिबंधासारखेच खाली दिलेले निबंध ही खूप उत्कृष्ट आहेत, ते वाचायला विसरू नका.

यूट्यूब व्हिडिओ –

हे निबंध सुद्धा वाचा –