नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI

नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही नागझिरा अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

नागझिरा अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

महाराष्ट्राच्या पूर्व भागातील भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य म्हणून नागझिराचा उल्लेख करायला लागेल.

भंडारा वनविभागातील तिरोडा क्षेत्रात लांबवर पसरलेल्या या अभयारण्याने सुमारे १३१.७५ चौरस किलो मीटर भाग व्यापलेला आहे. नागपूर पासून साधारण १३० किलो मीटर अंतरावर नागझिरा आहे.

गुगल मॅप लोकेशन )

आपल्याला लोहमार्गाने जायचे झाल्यास मुंबई-कलकत्ता लोहमार्गाने गोंदिया रेल्वे स्टेशनवर उतरावे व पुढे मुरली – नागझिरा असा मार्ग आहे.

दक्षिण पूर्व लोहमार्गावरील मुंबई हावरा लाईनवर तिरोडा रेल्वे स्थानक जवळ आहे. याच लोहमार्गावर गंगेझरी या स्थानकापासून नागझिराला जाता येते.

नागझिरा म्हटलं म्हणजे माझ्यासारख्या गडकोट पाहणाऱ्या गिर्यारोहकाला काही गोष्टी चटकन डोळ्यासमोर येतात.

त्या म्हणजे नागपूरची संत्री, व्यंकटेश माडगूळकर ऊर्फ अप्पा यांचे ‘ नागझिरा’ पुस्तक आणि येथील पशू-पक्षी व रसरशीत असा निसर्ग.

निसर्गाने नटलेल्या अशा नागझिरा या अभयारण्यास आजपर्यंत हजारो पर्यटकांनी भेट दिली आहे व यापुढेही लाखो पर्यटक भेट देतील व या ठिकाणचा आनंद मनापासून लुटतील यात शंका नाही. जसा गडांचा राजा म्हणजे किल्ले राजगड तसे मला वाटतं. अभयारण्यातील पहिले नंबरचे अभयारण्य म्हणजे नागझिरा होय. अनेक निसर्गप्रेमींना तसेच पर्यटकांना व लहान मोठ्या गिर्यारोहकांना येथील समृद्ध निसर्गाने आपलेसे केलेले आहे. या अभयारण्यात नागझिरा व थडेझरी ही दोन नैसर्गिक तळी आहेत.

याचे क्षेत्र प्रत्येकी ४ हेक्टर्स आहे. ही तळी बारामाही पाण्याने काठोकाठ भरलेली असतात. या सुंदर तळ्यामुळे पर्यटकांना सुखद आनंद मिळतो. या तळ्याच्या काठी येणाऱ्या वन्य पशुना यातील पाण्याचा विशेष करून उपयोग होतो.

एक तर पाणी पिण्याकरता व दुसरे म्हणजे थकल्यावर तळ्याकाठी रात्रीच्या वेळी शांत बसण्यासाठी.

रानावनात फिरताना सर्वात प्रथम पाण्याचे महत्त्व अधिक असते.

निसर्ग व प्राणी संपत्ती

ज्यांनी निसर्ग पाहिला निरनिराळ्या ऋतूतील गंमत अनुभवली व जे तासन्तास जंगलातून चालले आहेत, त्यांना वाटेत पाणी प्यायला अथवा पाहयला मिळाले त्यांना माझे म्हणणे अधिक पटेल.

नागझिरा म्हटले म्हणजे या ठिकाणी पानझडी वृक्षांचे जंगल आहे. विविध त-हेचे वृक्ष आपल्याला पाहयला मिळतात. प्रचंड उंची लाभलेले सागाचे वृक्ष आपले लक्ष वेधून घेतात.

धावडा, साला, बीजा ह्याही वृक्षांचं दर्शन घडते.

आवळा जांभूळ, बेहडा, हिरडा, टभुरणी, मोहा अशा प्रकारची फळझाडेही दिसतात. जंगलातून जाताना आपल्यालाही बांबुच्या बेटाचे दर्शन घडते.

पर्यटकांना अभयारण्यातून फिरताना विविध अनुभव येतात. कधी अशी निसर्गाचे वरदान असलेली ठिकाणे आपल्या मनाला सुखद आनंद देतात तर कधी आपल्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण करतात. विचित्र अनुभवांनीही निसर्गप्रेमी, पर्यटक अथवा अभ्यासक थक्क होतात. रात्रीचा मुक्काम झाल्यावर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे बाहेर पडल्यावर पहाटे पहाटे गार वारा अंगावर झेलत विविध प्रकारचे पक्षी पाहण्यात व त्यांचे निरनिराळे आवाज ऐकण्यात एक वेगळीच मजा असते. या ठिकाणी बुलबुल, मैना, देखणे पोपट, भारद्वाज, लावा, कोतवाल, सुतार, तांबट अशा प्रकारचे विविध पक्ष्यांचे दर्शन घडते.

चित्ता

चित्ता जगामध्ये सर्वात वेगवान प्राणी व उत्कृष्ट शिकारी जनावर म्हणून नावाजलेले आहे. ज्या ठिकाणी उत्तम जंगल आहे त्या ठिकाणी चित्ता आढळतो. खुरटी झुडपे असलेल्या पासून ते घनदाट जंगलातही आढळतो.

चिकारा, हरणे, लहान प्राणी व पक्षी, बकरे, शेळ्या हे त्याचे भक्ष आहे. विलक्षण वेगाने भक्षावर झडप घालून तितक्याच अथवा ताशी ७० कि मी. वेगाने तो भक्ष्यासह परत फिरू शकतो.

त्याला आपले पंजे मागे ओढून घेता येत नाहीत.

बिबट्याप्रमाणे त्याच्या अंगावर पट्टे नसून ठिपके असतात. त्याची अंगकाठी बारीक असून पाय अधिक चपळ वलांब असतात.

त्यांचे डोके लहान गोलाकार असतात, शेपूट केसाळ असून त्याचे केस पिंगट व राखाडी असतात. हा प्राणी हरिणासारख्या जमिनीवरून वेगाने धावणाऱ्या प्राण्यावरही विलक्षण वेगाने हल्ला करतो. चित्ता हा प्राणी झाडावर चढण्यामध्ये पटाईत असतो. त्याच्या शरीरावर संपूर्ण अंगभर ठिपके असतात.

याच्या अंगाच्या वरच्या भागावर पिवळ्या अथवानारंगी पिवळ्या रंगाची गडद छटा असते. नर सुमारे सात फूट व मादी सहा फूट असते. नराचे वजन साधारण ५० किलो व मादीचे वजन ३० किलो असते.

चित्ता हा प्राणी बंदिवासात पाळला असताना एकत्र येत नाही.

जहांगीरच्या काळामध्ये एका चित्त्याला गळ्यातला पट्टा निघाला असता नर व मादी मिलनानंतर मादी गाभण राहिली. पुढे २ महिन्यांनी तीन बछडे झाले अशी नोंद आहे.

१६१३ मध्ये जहांगीरने पाळलेल्या चित्त्यात एक मादीगाभणराहिली ही विशेष नोंद आहे. अकबर राजाला चित्ता ह्या प्राण्याचा फार शौक होता.

त्याने त्या काळात एक हजार चित्ते पाळले होते. चित्ता हा प्राणी एकांत असल्याशिवाय एकत्र येत नाहीत.

पर्यटन

अभयारण्यातील अनुभवावर निसर्गप्रेमीना मारुती चिंतमपल्लीसारखे लेखक बरच काही देतात. ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ सलीम अली सर्व परिचित होते.

मला वाटतं कोणतेही अभयारण्य अगदी बारकाईने, जिज्ञासू वृत्तीने तसेच डोळसपणे पाहायचे असेल, तेथील निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर किमान चार दिवस हवेत.

या चार दिवसात आपल्याला रोजच्या दिनचर्येपेक्षाबरेच काही नवे शिकायला मिळते. नव्या गोष्टी बघायला मिळतात.

मला वाटते आजकाल निसर्गाशी जास्त बोलावे तरचं आपले जीवन सुखी राहील आजच्या गतिमान जीवनात नागझिऱ्यासारख्या अभयारण्याला अधिक महत्त्व आहे.

प्रत्येक निसर्गप्रेमीनी एकदा तरी नागझिऱ्यास भेट द्यावी. या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा