नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI

नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

आपल्याला नांदूर मधमेश्वर अभयारण्य पाहण्याकरता पुण्याह्नएम. टी. ने सिन्नर येथे जायला लागते. सित्ररह्न आपण २० कि. मी. अंतर गेली की अभयारण्याच्या ठिकाणी पोचतो.

नाशिकपासून ५० कि. मी. हे अंतर आहे त निफाडपासून १२ कि. मी. अंतर आहे.

गुगल मॅप लोकेशन )

गंगा, गोदावरी व कादवा या नद्यांवरील बंधाऱ्यामुळे या ठिकाणी एकउत्तम जलाशय झाला.

पक्ष्यांकरता उत्तम ठिकाण झाल्यामुळे साहजिकच या ठिकाणी शेकडो पक्षी आश्रयाला यायला लागले.

इतके वृक्ष नसले तरी विविध प्रकारच्या पक्ष्यांनी या ठिकाणचा परिसर नयनमनोहर केला आहे. या अभयारण्याचे श्रेय क्या अथने डॉ. सलीम अली यांचे आहे.

१९८२ मध्ये या ठिकाणी भेट दिल्यावर त्यांनी शासनाकडे पक्ष्यांच्या रक्षणाच्या योजनेचा पाठपुरावा केला. कालांतराने या अभयारण्याची स्थापना झाली.

पर्यटन

या ठिकाणी १०० चौरस किलोमीटरचा भाग संरक्षित आहे. पक्ष्यांची शिकार करण्यास बंदी आहे. साहजिकच याचा परिणाम असा झाला की पक्षी स्थिरावले.पक्ष्यांना अभय मिळाले.

दिवसेंदिवस या ठिकाणचे सौंदर्य बाढीस मदत होऊलागली. किमान चार तास या ठिकाणी आपण फिरलोवसारापरिसर न्याहाळला तर आपले मन तृप्त होते.

मन प्रसन्न होते पक्षी आपल्यातील व निसर्गातील एक महत्त्वाचा दुवा आहे. असे मला वाटते.

पक्षी हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. थोडी फार शेताची नासाडी होत असली तरी शेतकऱ्याला बऱ्याच प्रमाणात या पक्ष्यांचा उपयोग होऊ असतो. निसर्गातील समतोल राखण्यासाठी पक्ष्यांची नितांत आवश्यकता आहे.

हिवाळ्यामध्ये नांदूर मधमेश्वरचे वैभव डोळ्यात साठवण्यासारखे असते. विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी आपली हजेरी लावतात.

महाराष्ट्रातील पक्ष्यांबरोबरच परदेशातून आलेले पक्षीही आपले लक्ष वेधून घेतात.

निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती

या ठिकाणी जलाशयात आपल्याला खंड्या, सुगरण, धोबी, तुतारी, शेकट्या, लावा, मराल, कमलपक्षी, चक्रवाक, चक्रांग बदक, बगळा, करढोक, सारस असे अनेक प्रकारचे, निरनिराळ्या आकाराचे, निरनिराळ्या रंगांचे विविध सवयीचे, सौंदर्याने रसरसलेले पक्षी आपल्याला

पायला मिळतात. खरं तर हा एक सुखद योग आहे, अनुभव आहे, हे सौंदर्य पाहण्याकरता या ठिकाणी अवश्य जायला हवे. या ठिकाणी पर्यटकांकरता शासकीय विश्रामधाम आहे.

नाशिक येथील वन विभागाशी पत्रव्यवहार केल्यास आपली निवास व्यवस्था होऊ शकते. नांदूर मधमेश्वरचे सौंदर्य पाहण्याकरता सप्टेंबर ते मार्च हा उत्तम कालावधी आहे.

नीलगाय

नीलगाय हा प्राणी साधारण घोड्यासारखा दिसतो. ह्या प्राण्यामधील पूर्णपणे वाढलेला नर जमिनीपासून ४ फूटापर्यंत उंच असतो. मादी नरापेक्षा थोडी लहान असते.

पूर्ण वाढलेल्या नराचा रंग ऊदी अथवा राखाडी असतो. त्याच्या प्रत्येक पायावर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. त्याच्या दोन्ही गालावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात.

ओठ, हनुवटी, कानाच्या आतील भाग तसेच शेपटीच्या आतील भाग पांढरट असतो.

नर आणि मादी दोघांच्या मानेवर काळ्या रंगाची केसांची खुरटी आयाळ असते. नराच्या गळ्याला दाढी सारखे लांब असे काळे केस असतात.

हा प्राणी गवताळ तसेच खुरट्या झाडाझुडपांनी भरलेल्या अरण्यात मोकळेपणाने निवांत चरत असतात, दुपारचे कडक ऊन सोडले तर हा प्राणी साधारण दिवसभर आपले खाद्य खाण्याकरता बाहेर असतो.

नीलगाय झाडा-झुडपांचा पाला, गवत, चारा विशेष आवडीने खातो. मोहोराची ताजी फुले या प्राण्याला मनापासून आवडतात.

विशेष म्हणजे पाण्याशिवाय चार, चार दिवस राहू शकतात.

नीलगाय हा प्राणी पळण्यामध्ये चपळ व वेगवान आहे. या प्राण्याचे दृष्टिविज्ञान चांगले असते. याची श्रवणशक्ती मात्र फारशी चांगली नसते.

काळवीट चौशिंगा याप्रमाणे नीलगाय हा प्राणीदेखील एकाच ठिकाणी आपली विष्ठा टाकतो. नर कळप करून फिरतात. एका कळपात १० ते १५ नर असतात.

नीलगायीचा गर्भधारणेचा काल सुमारे ८ ते ९ महिने असतो. एका वेळेस एक अथवा दोन पिले जन्मास येतात.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा