पैनगंगा अभयारण्य माहिती | PAINGANGA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “पैनगंगा अभयारण्य मराठी माहिती” म्हणजेच “PAINGANGA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
पैनगंगा अभयारण्य मराठी माहिती व ठिकाण
पैनगंगा हे अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याच्या परिसरात वसलेले आहे. निसर्गाने नटलेल्या पैनगंगा या अभयारण्यात पर्यटकांनी आवर्जून जावे. पैनगंगा नावाची नदी या अभयारण्याच्या सीमेवरून जात असल्यामुळे यास पैनगंगा अभयारण्य म्हणतात.
( गुगल मॅप लोकेशन )
या भागामध्ये असणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन पैनगंगा या अभयारण्याची निर्मिती २७ मे १९७१ च्या आद्यसूचनेनुसार करण्यात आली.
निसर्ग व प्राणी, पक्षी संपत्ती
या अभयारण्यात फिरताना आपल्याला रानमांजर, जंगली कुत्रा, नीलगाय, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, चौसींगा, माकड, अस्वल, खार अशा विविध प्राण्यांचे दर्शन होते.
या ठिकाणी सरपटणार्या प्राण्यांपैकी धामण, नाग, मण्यार, अजगर, परड, मोर, पोपट, तित्तर, सुगरण, खंड्या, सुतार, पिलक, टकाचोर, धोबी, पाणकोंबडी अशा प्रकारचे कितीतरी स्थलांतरीत पक्षी पाहयला मिळतात. कासव पाहवयास मिळते.
पैनगंगा या अभयारण्यातील वने, दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पर्णगळी वने या प्रकारात मोड़तात. या अभयारण्याच्या निसर्गमय वातावरणात पैनगंगा नदीवर एक नैसर्गिक डोह आहे. यास ‘सहस्रकुंड’ म्हणून संबोधले जाते.
या स्थळास भेट देण्यास जुलै ते ऑक्टोबर हा काळ अगदी योग्य आहे. या महिन्यात या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यास अधिक आनंद वाटतो. या ठिकाणी आपल्याला साग, धावडा, सुर्या, सालई, बेल, मोहा,
बिजा, बेहडा, अंजन, आवळा, चिंच अशा प्रकारची मोठी झाडे पाहावयास मिळतात.
पायाखालची माती उडवत चालताना गळणाऱ्या पानामधून अथवा पानांवर पाय टाकून चालताना एक वेगळेपण जाणवते.
मारवेल, पवण्या, कुंदा, तिखाडी, धामणवेल, गुळवेळ अशा प्रकारच्या कितीतरी वेलींचे दर्शन आपल्याला घडते.
पैनगंगा या अभयारण्यामध्ये पर्यटकांना जाण्याकरीता योग्य काळ म्हणजे १ ऑक्टोबर ते १५ जून हा होय.
थोडक्यात पण महत्त्वाचे
या अभयारण्यात जाण्याकरीता खालील सोयी उपलब्ध आहेत-
- जवळचे बस स्थानक : किनवट, उमरखेड
- जवळचे रेल्वे स्थानक : नांदेड, अकोला
- निवास व्यवस्था : १) वन विश्रामगृह- चिखली, २) वन विश्रामगृह- खरबी, ३) वन विश्रामगृह- सोनदाबी, ४) जिल्हा परिषद विश्रामगृह-मुरली
- जवळचे विमानतळ : औरंगाबाद
- अधिक माहितीकरता संपर्क : सहाय्यक वन संरक्षक, पैनगंगा अभयारण्य, उमरखेड -४४५२०६. जिल्हा यवतमाळ, दूरध्वनी- (०७२३१) – ३७ ३१२.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- भीमाशंकर अभयारण्य माहिती | BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- रेहेकुरी अभयारण्य माहिती | REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती | CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI
- सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- राधानगरी अभयारण्य माहिती | RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- अनेर डॅम अभयारण्य माहिती | ANER DAM WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- तानसा अभयारण्य माहिती | TANSA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI
- जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- माळढोक पक्षी अभयारण्य माहिती | MALDHOK PAKSHI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- कर्नाळा अभयारण्य मराठी माहिती | KARNALA BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- ज्ञानगंगा अभयारण्य माहिती | DYANGANGA ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- काटेपूर्णा अभयारण्य माहिती | KATEPURNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI