पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI

पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही पारगड किल्ला माहिती मराठी म्हणजेच “PARGAD FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

पारगड किल्ला माहिती मराठी

तसे पाहिले तर सर्व गडांमध्ये पारगड हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला असे म्हणायला हरकत नाही. गोव्याच्या स्वारीवरून येताना सन १६७६ मध्ये शिवाजीराजांनी हा गड बांधला.

त्यावेळेस गडावर शिवाजीराजांचे ५०० मावळे तसेच शेलारमामांचे चिरंजीवही उपस्थित होते.

महाराजांचा शब्द मावळे अतिशय काटेकोरपणे पाळत. त्यात त्यांना अभिमान वाटे.

ठिकाण

अतिशय उपयोगी असा किल्ला, पण या गडाचा गवगवा काही झालाच नाही.

सह्याद्रीच्या दुर्गम अशा राईमध्ये ९१४ मी. फूट उंची लाभलेला असा हा गड जणू काही अरबी समुद्रावर आपली कडक नजर ठेवून उभा आहे.

गुगल मॅप लोकेशन )

उत्तर दिशेस लष्करी कारवायांवर बारीक लक्ष असे वाटते.

सारासार विचार करता सन १८५७ नंतरही हा गड जिंकण्यात इंग्रजांना अजिबात यश आले नाही हे प्रामुख्याने या ठिकाणी म्हणावेसे वाटते.

ऐतिहासिक निर्देश

किल्ल्यावर हाकाटी देण्याकरिता मुसलमानांनाही ठेवण्यात आलेले होते. गडाच्या इतर देखरेखीकरिता महारांना ठेवलेले होते. आजही गडावर यांचे वंशज आढळतात.

गडाचे बारकाईने निरीक्षण केले तर आपणास दिसून येते की, पूर्व, पश्चिम, उत्तर अशा तिन्ही बाजूंनी ताशीव कड्यांनी संपूर्ण किल्ल्याची नैसर्गिकरीत्या संरक्षक तटबंदी उभारलेली आहे.

दक्षिण गडावर येण्यासाठी म्हणायला उतरण आहे खरी, पण त्या ठिकाणी प्रचंड अशी दरी असल्याकारणाने शत्रू एकदम चाल करून येण्याची शक्यता फारच कमी.

तीनशेसाठ पायन्यांची पश्चिमेच्या बाजूला एकुलती एक वाट आहे.

अशा प्रकारची वाट भक्कमरीत्या रोखल्यावर गडावर येणे फार कठीण जाई.

या एकमेव कारणामुळेच हा पारगड मोगलांना तसेच इंग्रजांना जिंकता आला नाही. ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे.

रचना व स्थळे

तटबंदीच्या विचारातून खूपच चांगली तटबंदी लाभलेला गड म्हणायला पाहिजे. पूर्वेला कलानंदी गड, उत्तरेस महादेव गह, मनोहर गड, दक्षिणेस तिलारी नदी, पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत राई पसरलेली आहे.

खरोखरच सुंदर दृश्य आपणास पाहयला मिळते. गडाच्या उत्तरेस सर्जा नावाचा दरवाजा, फडणीस बुरुज, माळवा बुरुज आपणास दिसतो.

पूर्वेकडील भवानीमातेच्या देवळेतील मूर्ती खास पाषाणाची आहे.

बारकाईने आपण पाहिले तर या मूर्तीत प्रतापगड व सातारा येथील मातेच्या मूर्तीशी खूपच साम्य आढळते. या मूर्तीचे आणखी वैशिष्ट्य असे की, मूर्तीवर सूर्योदयाचे किरण वर्षभर पडतात.

या देवळाच्या उजवीकडे श्रीगणेशाची मूर्ती असून जवळच शिवलिंग आहे. भले मोठे आवार असल्यामुळे उत्सव साजरे करता येतात.

शिवाजीराजांनी तसेच इतरांनी दिलेले जे दागिने आहेत ते देवीचे अंगावर उत्सवाचे वेळी घालण्यात येतात. या देवीचे पुरोहित पिढ्यानूपिङ्या धार्मिक विधी करत आले आहेत.

असा हा अजिंक्यगड निश्चित एकदा तरी पाहायला हवा.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा