पाऊस पडला नाही तर मराठी निबंध | PAUS PADLA NAHI TAR ESSAY IN MARATHI

पाऊस पडला नाही तर मराठी निबंध | PAUS PADLA NAHI TAR ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “पाऊस पडला नाही तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये PAUS PADLA NAHI TAR ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • जोरदार पडणारा पाऊस
  • पावसाच्या पाण्याचे उपयोग
  • पावसाळी चिखल, गढूळ पाणी, रोगराई
  • शेती पावसावर अवलंबून

पाऊस पडला नाही तर मराठी निबंध | PAUS PADLA NAHI TAR ESSAY IN MARATHI

आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला होता. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. घराबाहेर पडणेही कठीण झाले होते.

शी! काय तो चिखल! ते गढूळ पाणी! त्यातून चालायचे म्हणजे मोठी कसरतच! अशा वेळी मला वाटू लागले. पाऊस पडलाच नाही तर…. काय बरं होईल? माझ्या मनात विचार सुरू झाला….

नद्यांना पूर येणार नाहीत. मालमत्तेचे नुकसान होणार नाही. रस्त्यांवर चिखल होणार नाही, गटारे तुंबणार नाहीत.

रोगराई फैलावणार नाही. बस, गाड्या यांची वाहतूक ठप्प होणार नाही. पावसामुळे सगळ्यांना फक्त त्रासच भोगावा लागतो का? पाऊस पडला नाही तर खरंच चालेल? नाही चालणार! कारण शेतकरी शेती कशी करणार? अन्नधान्य कसे पिकवणार? सर्वांना प्यायला पाणी कसे मिळणार? झाडे हिरवीगार कशी राहणार? यासाठी पाऊस हा हवाच.

बरं, पाण्याशिवाय वीजनिर्मिती थांबेल. उदयोगधंदे बंद पडतील. त्यामुळे देशाचा विकास थांबेल. अरे बापरे! पाऊस पडला नाही तर, किती मोठी हानी होईल!

पावसाळ्यात काही दिवस गढूळ पाणी, चिखल, पाण्याने वाहणारे रस्ते हे सगळे सहन करू. पण पाऊस मात्र हवाच!

पाऊस जर पडला नाही तर, पाणी अडवणार कसे? जिरवणार कसे? आणि साठवणार कसे? पाणी साठवले नाही तर मार्च महिन्यापासून जलाशय रिकामे होऊ लागतात.

दैनंदिन वापरासाठी पाण्याची काटकसर करावी लागते. माणसे, पशू, पक्षी सगळेच हैराण होतात. त्यामुळे “पावसा तू खूप खूप बरस!”

हे निबंध सुद्धा वाचा –