फुले बोलू लागली तर मराठी निबंध | PHULE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI

फुले बोलू लागली तर मराठी निबंध | PHULE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “फुले बोलू लागली तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये PHULE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • फुलांचे बोलणे
  • माळीदादाला धन्यवाद
  • फुलांची विविध रूपे दिसत
  • माणसाला आनंद देण्याची इच्छा

फुले बोलू लागली तर मराठी निबंध | PHULE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI

आई ग! तोडलंस ना मला! किती दुखलं! पण तुला काय त्याचं! आम्ही मुकी बिचारी! आम्हांला तोडा, ओरबाडा, किंवा पायदळी कुस्करा तुडवा.

आम्ही आपले सुगंध देण्याचे काम करीत राहणार! काय म्हणालास? कोण बोलतंय? असं काय विचारतोस? अरे आम्ही फुलं बोलतोय, फुलं!

आम्ही नेहमी सुगंध देण्यासाठी सगळ्यांच्या जवळ जातो. कधी छान पुष्पगुच्छ बनतो. कधी आमचा हार तयार होतो, तर कधी गजरा तयार होतो.

आम्हांला ही सगळी रूपे आवडतात. कारण त्या रूपांमुळे आम्ही तुम्हा सर्वांना आनंद देत असतो. आज आम्ही बोलू शकतो. म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतोय.

“कधी फुलांच्या बागा पाहिल्यात का?” नसतील पाहिल्यात तर जरूर पाहा. आमचे विविध आकार आणि रंग तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण जरूर घेऊन येतील. सणासुदीला, लग्नसमारंभाला आमचे खास महत्त्व असते हे तुम्ही जाणताच.

आम्हांला सगळ्यांत जास्त बोलायला आवडेल ते त्या माळीदादाशी; कारण ते आमच्या वेलींसाठी वाफे तयार करतात. पाणी घालतात. खत घालतात.

आम्हांला सूर्यप्रकाश मिळावा म्हणून आमच्या वेलींना हळुवारपणे मांडवावर चढवतात.

आमचे आयुष्य फार तर एक-दोन दिवसांचे असते. त्या एखाद-दुसऱ्या दिवसांत पक्षी, भुंगा, मधमाशी यांनाही आनंद दयायचा असतो.

त्यामुळे आमच्यातील काहीजणांना तरी वेलीवर तसेच राहू दया. परिसराची शोभा अशीच सुंदर राहू द्या.

हे निबंध सुद्धा वाचा –