प्रतापगडाची माहिती | PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI –
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “प्रतापगडाची माहिती” म्हणजेच “PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
प्रतापगडाची माहिती, रचना व ठिकाण
महाराष्ट्राचे खरे वैभव म्हणजे सह्याद्रीचा निसर्ग. आपण प्रतापगडला जाताना हा हिरवा निसर्ग मन भारुन टाकतो.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे सुप्रसिद्ध ठिकाण सर्वांना परिचित आहे.
महाबळेश्वर येथून आपण पश्चिमेस नजर टाकली तर पायामध्ये बसलेला प्रतापगड आपल्याला दिसतो.
घनदाट जावळीच्या खोऱ्यात पार घाटाच्या माथ्यावरती हा गड वसलेला आहे.
या डोंगराचे मूळ नाव रान आडवा गौड’ कोयनेच्या खाण्यावर लक्ष ठेवण्यास शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला असावा असे वाटते.
पुण्याहून एस.टी. च्या बसेस आहेत. टैंक्सी सर्व्हिस आहे. आता तर बऱ्याच खाजगी कंपन्यांच्या बसेसही उपलब्ध आहेत. ( गुगल मॅप )
प्रतापगडाची माहिती ऐतिहासिक निर्देश
अफझलखानाचा वध ही महान ऐतिहासिक घटना याच प्रतापगडावर घडली.
शिवाजी महाराजांना मारण्याकरता खान विजापूरहून पैजेचा विडा उचलून निघाला पण त्याचे हसे झाले.
प्रतापगडाचे बांधकाम इ.स. १६५६ ते १६५८ या दोन वर्षामध्ये पूर्ण झाले. मोरोपंत पिंगळे यांनी आपले सर्व कसब तसेच लष्करी ज्ञान पणाला लावून गड बांधण्यात आला.
तुळशीदास या शाहिरानी म्हटले, ‘राजगाड राजाचा, प्रतापगड जिजाईचा
अफझलखानाचा वध
१० डिसेंबर १६५९. वार गुरूवार दुपारी २ वाजता शिवाजीराजांनी अफझलखानाचा वध केला. गडावरच्या माचीवर भव्य शामियाना उभारला होता.
उरल्याप्रमाणे खान सजवलेल्या शामियानात दाखल झाला. खानाने मोठ्या आनंदाने शिवाजी राजांना अलिंगन दिले. शिवाजी राजांची मान खानाने आपल्या बगलेत दाबली व कट्यार शिवाजी राजांच्या कुशीत घुसवली.
अशा प्रकारच्या कपटाची कल्पना शिवाजी राजांना असल्यामुळे अगात घातलेल्या चिलखतामुळे खानाचा वार फुकट गेला.
शिवाजी राजांनी मोठ्या शिताफीने आपली वाघनखे खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोथळाच बाहेर काढला.
वाघनखे वापरण्याचा जागतिक इतिहासातला एकमेव प्रसंग होय असे प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर यांचे निरिक्षण आहे.
खानाबरोबर आलेल्या सय्यद बंडाने शिवाजी राजांवर तलवारीचा वार करण्यासाठी पवित्रा घेतला.
पण तेवढ्यात शिवाजी राजांबरोबर असलेल्या जिवा महालाने त्याचा हात कलम केला. खान मेला.
सगळ्या गडावर आनंदाचे वातावरण पसरले. जावळीचे रान हर हर महादेव या गजरानी दुमदुमले.
शिवाजी राजांचे मराठा गडी खानाच्या सैन्यावर तुटून पडले. शिवाजी राजांच्या गनिमी काव्याने मोगल बादाशहा औरंगजेब पण अस्वस्थ झाला.
प्रेक्षणीय स्थळे
प्रतापगड पहाण्याकरीता आपण गेलो की दोन दिवस मुक्काम करावा.
महाबळेश्वर मधील २८ पॉईंट पाहावेत. पाचगणी येथील १ पॉईंट पहावेत.
प्रतापगडावर अफझलखानाची कबर, भवानी मातेचे मंदिर, हनुमान मंदिर, शिवछत्रपती चा पुतळा, शिवसृष्टी ही ठिकाणे पहावीत.
महाबळेश्वरातील मंदिरे पहावीत. निसर्गाने नटलेल्या प्रतापगडास एकदातरी अवश्य भेट द्यावी.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI
- सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI
- राजगड किल्ला माहिती मराठी | RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI
- तोरणा किल्ल्याची माहिती | TORNA FORT INFORMATION IN MARATHI
- रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI
- चाकण किल्ला इतिहास | CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI
- शिवनेरी किल्ल्याची माहिती | SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI
- लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI
- सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI
- चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI
- वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI
- अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI
- प्रतापगडाची माहिती | PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI
- रायगड किल्ला माहिती | RAIGAD FORT INFORMATION IN MARATHI
- कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI
- जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI
- लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI
- गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI
- हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI
- धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI
- पन्हाळगड किल्ला मराठी माहिती | PANHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI
- विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- देवगिरी किल्ला माहिती | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI
- सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI
- सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI