पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI

पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही पुरंदर किल्ल्याची माहिती म्हणजेच PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

पुरंदर किल्ल्याची माहिती व ठिकाण

पुण्याहून जवळच असलेले प्र.के. अत्रे यांचे सासवड गाव सोडले की, इतिहास प्रसिध्द पुरंदर किल्ला आपल्याला दिसतो. पूर्वेकडील उंच शिखर म्हणजे पुरंदर होय.

कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट ओलांडला की आपल्याला किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्याच्या दक्षिण दिशेस नीरा नदी तर उत्तरेस कहा नदी वाहते.

गुगल मॅप लोकेशन )

कसे जायचे / मार्ग

पुण्याहून पुरंदरला जाण्याकरिता एस. टी. ची सोय चांगली आहे. आपण सकाळी गेलो की संध्याकाळपर्यंत घरी येऊ शकतो. किल्ल्यावर डांबरी रस्त्याने परिसर स्वच्छ व चांगला वाटतो. किल्ल्यावर बराचसा भाग एनसीसी सैनिकांनी व्यापलेला आहे.

सैनिकी ऑफिस, ऑफिसर्स विभाग इत्यादी नवीन भाग आपल्याला पहायला मिळतो. गडावर आपण गेलो की, आपल्या डोळ्यासमोर अनेक घटना उभ्या राहतात.

संभाजी राजे यांचा जन्म, सवाई माधवराव यांचा जन्म, दिलेरखानाने किल्ल्याभोवती दिलेला वेढा, मुरारबाजीची शर्थ इत्यादी.

पुरंदर किल्ल्याची रचना

गडाची उंची साधारण १४०० मीटर आहे. उत्तरेकडील वाटा जास्त प्रशस्त आहेत. पुरंदरवर पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.

पुरंदरेश्वर, केदारेश्वर, रामेश्वर ही देवळे, पेशव्यांचा वाडा असा माचीचा भाग होय. माथ्यावरच्या भक्कम अशा दरवाज्यातून आपण गेलो की पूर्व दिशेस खांदकडा, मध्यात राजगादी, पश्चिम दिशेस केदारेश्वराचे मंदिर आहे. गडावरून आपण सभोवताली नजर टाकली की बऱ्याच देखण्या गडांचे दर्शन होते.

सिंहगड, राजगड, विचित्रगड इत्यादी भक्कम किल्ले पाहिले की मन आनंदाने भरून येते. मनामध्ये अनेक आठवणींची गर्दी होते.

गडावरचा भाग नीट ठेवण्याकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे, वास्तू जतन केल्या पाहिजेत.

ऐतिहासिक निर्देश

निजामशाही बुडाल्यानंतर पुरंदर हा किल्ला आदिलशाहीखाली आला. या किल्ल्यावरील शेंदऱ्या बुरुजाची गोष्ट प्रसिध्दच आहे.

बहीरनाक याने आपला पुत्र नाथनाक व सून देवकाई अशा दोघांना बुरुजाचे बांधकाम चालू असताना चिणण्यात आले.

१६९५ नंतर या किल्ल्याला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले. राजगडाची निर्मिती व्हायच्या अगोदर पुरंदरावर छत्रपतींची राजधानी होती, पेशव्यांची होती.

किल्ल्यावर फेरफटका मारण्यास एक दिवस पुरेसा होतो.

सकाळी लवकर निघून संध्याकाळी आपल्याला परतता येते. किल्ल्यावरील हवा सुरेख आहे. अनक घटनांनी लक्षात राहील असा पुरंदर होय.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा