राधानगरी अभयारण्य माहिती | RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “राधानगरी अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
राधानगरी अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण
कोल्हापूर वनखात्याने दाजीपूर येथे अभयारण्य सन १९५९ मध्ये स्थापन केले. कोल्हापूरच्या वनखात्याच्या या सुंदर प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाची उत्तम साथ मिळाली. त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या गावापासून फोंडा मार्गावर ३२ किलो मीटर अंतरावर प्रसिद्ध दाजीपूर हे कोकणच्या सरहद्दीवरचे एक स्थळ आहे.
( गुगल मॅप लोकेशन )
निसर्गाची विविध रूपे निरनिराळ्या ऋतूत अनुभवायची असतील तर दाजीपूरला जायला हवे.
प्राणी संपत्ती
दाजीपूर हे विशेषतः रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे. गवा हा वन्य प्राणी कळप करून राहणारा आहे. हा प्राणी पूर्णत: शाकाहारी आहे. गवाच्या शरीराचा रंग काळा असतो. त्याचे डोके रुंद व मजबूत असते. गव्याची शिंगे थोडीशी पुढे झुकलेली व डौलदार असतात. दाजीपूर जंगलात आपल्याला विविध प्रकारचे वृक्ष, वेली, रानडुक्कर, बिबट्या, अस्वल अशा प्राण्यांचे दर्शन घडते.
विविध प्रकारचे पक्षीही आपल्याला पाहयला मिळतात. वनौषधी वनस्पतींचेही मनोहारी दर्शन शेकडो हजारो पर्यटकांना घडते. या ठिकाणी सरकारी व्यवस्था उत्तम आहे.
गवा

महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर, अमरावती, भंडारा ह्या जिल्ह्यामधील डोंगराळ व पहाडी प्रदेशात गवे मोठ्या संख्येने आढळतात गव्याला राहयला उंच पहाडी प्रदेश, डोंगरमाथा अशा प्रकारच्या जागा आवडतात. उन्हाळ्यामध्ये मात्र त्यांची जागा ते बदलतात. ज्या ठिकाणी उत्तम हिरवळ असेल त्या ठिकाणी गवा असतो.
गवे पहाटे, पहाटे चरायला बाहेर पडतात. ऊन कोवळे असेपर्यंत ते चरतात. एखादे वेळेस ढगाळ हवा असली तर दिवसभरसुद्धा चरतात.
दुपारच्या कडक उन्हात मात्र ते गारव्याला बसतात. गवा या प्राण्याचे खाद्य म्हणजे गवत व झाडाचा पाला. गवा हा प्राणी स्वभावाने लाजरा असतो.
गव्याचे शक्तिमान शरीर हेच त्याचे एकाअर्थी संरक्षण होय. ह्याचे गंधज्ञान तीव्र असते. पूर्ण वाढलेला नर गवा पावणेसहा ते सहा फूट असतो. मादी साधारण साडेपाच फूट असते.
भारतामध्ये सापडणाऱ्या गव्यांमध्ये आसाम तसेच दक्षिण भारत या ठिकाणच्या अरण्यातील गवे शरीर प्रकृतीने मजबूत असतात.
नराच्या शिंगाचा मुळापासून विस्तार ३३ ते ३६ इंचापर्यंत असतो. माद्यांची शिंगे लहान असतात. उत्तम नर गवा ९०० कि. ग्रॅम भरतो. गवा या प्राण्याची शरीरयष्टी मजबूत असते. त्याचे पाय जाड व बुटके असतात. हा प्राणी शक्तिवान असतो.
गव्याचे नुकतेच जन्माला आलेले पिलू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते. पूर्ण वाढलेल्या गव्याच्या शरीराचा रंग सर्वत्र सारखाच काळा असतो. त्याच्या शरीरावर केसांचे प्रमाण अल्प असते.
त्याचे कपाळ राखाडी किंवा भुरकट रंगाचे असते. गवा या प्राण्याचे चारही पाय गुडघ्यापर्यंत पांढरे पायमोजे घातल्यासारखे दिसतात.
याच्या डोळ्यांचा रंग तांबडा असतो. नर मुख्यत: डिसेंबर अथवा जानेवारीच्या सुरुवातीस मदावर आलेले दिसतात. सप्टेंबरमध्ये नवीन पिले कळपामध्ये आढळून येतात.
नवीन पिलांचा जन्म झाल्यावर पिलाची आई व पिलू एकांत जागी जाऊन बसतात.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- भीमाशंकर अभयारण्य माहिती | BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- रेहेकुरी अभयारण्य माहिती | REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती | CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI
- सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- राधानगरी अभयारण्य माहिती | RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- अनेर डॅम अभयारण्य माहिती | ANER DAM WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- तानसा अभयारण्य माहिती | TANSA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI
- जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI