राजगड किल्ला माहिती मराठी | RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI –
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “राजगड किल्ला माहिती मराठी” म्हणजेच “RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
राजगड किल्ला माहिती मराठी व ठिकाण
गडांचा राजा म्हणून “राजगड” ओळखला जातो. निसर्गनिमी लोकांचा आवडता किल्ला कोणता असा एखाद्याने जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर राजगड हेच बरोबर होईल.
आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी आजही ताठ मानेने हा किल्ला उभा आहे. पुण्याहन नसरापूर-वेल्हे मागनि राजगडावर जाता येते. विंझर मागे गेलो तर कानदी नदी ओलाडून जावे लागते. गडावर जाण्याकरिता तीन ते चार मार्ग आहेत. अतिशय भक्कम, अवघड, देखणा व विस्ताराने मोठा असा हा राजगड किल्ला होय.
आपण थोडक्यात पुढील स्थळांचा परिचय करून घेऊ.
( गुगल मॅप लोकेशन )
राजगडावरील स्थळे
संजीवनी मारची –
ही कमीत कमी ८ की.मी. लांब आहे. माची अरुंद आहे.
भक्कमरीत्या बांधलेले तट दोन्ही बाजूंनी आहेत. तीन टप्प्यात उतरती होत गेलेली माची दिसते. चिलखती बुरूज पाण्याची टाकी अशी व्यवस्था होती.
पद्मावती माची –
या माचीवर लांब रुंद अशी जागा, पाण्याची उत्तम प्रकारे असलेली सोय आणि गडावरची प्रमुख वस्ती याच माचीवर आढळते.
निशाणाची जागा, राजवाडा, अंबरखाना, घोड्याची पागा, तळे, अनेक पाण्याच्या टाक्या आपल्याला गडावर पहायला मिळतात.
इ.स. १९४० पर्यंत सदरेची जागा, पद्मावतीचे देऊळ, दिवाणघर अशा तीन इमारती बऱ्या अवस्थेत होत्या.
सुवेळा माची –
ही माची संजीवनी माचीइतकी लांब नाही. या ठिकाणी मर्दुमकी गाजवलेल्या वीरांची घरे आढळतात. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिलिंबकर, प्रत्येक घराजवळ आपल्याला पाण्याची सोय केलेली दिसते.
भक्कम तटबंदी, आतील कप्पा, बाहेरील कप्पा, चिलखती बुरूज़, मजबूत स्वरूपाच्या पायऱ्या आपल्याला दिसतात.
तटाच्या दोन्ही अंगाला संजीवनी माचीप्रमाणे चिलखत बांधणी, विवर आपल्याला बघायला मिळते.
३ ते ५ मीटर व्यासाचे एक नैसर्गिक छिद्र आहे ते दिवसेंदिवस वाढतच आहे.
बालेकिल्ला –
बालेकिल्ल्यावर जाण्याकरिता पद्मावती माचीवरून पूर्व दिशेने जाण्याची वाट आहे. जो सराईत गिर्यारोहक आहे किंवा अशा ठिकाणी जाण्याची सवय आहे तोच जाऊ शकतो. खाली दिसणारी प्रचंड खोल दरी आहे. दरीकडे पाहिले की अक्षरश: पाय थरथरायला लागतात. निसर्गाच्या अक्राळविक्राळ रूपाची माणसास भीती वाटते ! शब्दात फारसे सांगता येणार नाही, प्रत्यक्षात जर गेलो तरच निसर्गाची रुद्रता म्हणजे काय ते कळेल. बालेकिल्ला चोहोबाजूंनी कडा तुटलेल्या उंच खडकावर, आहे. सुरक्षिततेकरिता तटबंदी केलेली आढळते. राजगडापेक्षा रायगडावरील बाजारपेठेचा भाग अधिक प्रशस्त वाटतो. गडावरून आपल्याला बराच भाग चांगल्या प्रकारे दिसतो. उदा.- पुरंदर, पुणे, भाटघर, रायरेश्वर, रायगड, महाबळेश्वर इत्यादी. गडाची बांधणी खूपच सुंदर व देखणी आहे. शिवाजी महाराजांच्या काळात राजगडाला फारच महत्त्व होते. महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटना या गडावर घडल्या. महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे राजगड.
राजगडावरील स्थळे
- कोटाचे चिलखत
- गणेश देऊळ
- पद्यावती मंदिर
- गुंजन दरवाजा
- आळू दरवाजा
- पद्यावती तळे
- दारूखाना
- दिवाणघर
- पागा
- चिलखती बुरूज
- मारुती देऊळ
- ब्रह्मर्षि मंदिर
- जननी मंदिर
- पाली दरवाजा
- बालेकिल्ला दरवाजा
- ढालकाठची जागा
- दिंडी
- राजवाडा
- चुनेगचा हौद
- बालेकिल्ला
ऐतिहासिक निर्देश
शहाजींच्या प्रसिध्द कैदेच्यासमयी महाराजांकडे त्यावेळेस राजगड, सिंहगड, पुरंदर हे गड होते. राजगड ही शिवाजीने आपली राजधानी केली होती. (शिचसा १९|५४). आलमगिरी जु. ८ खेल ५, १८५७ भाद्रपद (शके ७-इ.स. १६६५ सप्टें.४) रोजी शिवाजीने जयसिंगाचे मध्यस्थीने मुघलांशी मांडलिकत्वाचा तह केला. त्यामध्ये त्याने २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले व जे बारा किल्ले होते त्यात महाराजांकडे राजगड हा प्रसिध्द किल्ला होता.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI
- सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI
- राजगड किल्ला माहिती मराठी | RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI
- तोरणा किल्ल्याची माहिती | TORNA FORT INFORMATION IN MARATHI
- रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI
- चाकण किल्ला इतिहास | CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI
- शिवनेरी किल्ल्याची माहिती | SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI
- लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI
- सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI
- चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI
- वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI
- अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI
- प्रतापगडाची माहिती | PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI
- रायगड किल्ला माहिती | RAIGAD FORT INFORMATION IN MARATHI
- कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI
- जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI
- लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI
- गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI
- हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI
- धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI
- पन्हाळगड किल्ला मराठी माहिती | PANHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI
- विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- देवगिरी किल्ला माहिती | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI
- सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI
- सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI