रेहेकुरी अभयारण्य माहिती | REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “रेहेकुरी अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
रेहेकुरी अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी अभयारण्य पुण्यापासून १५० किलो मीटर अंतरावर आहे. नगरपासून या अभयारण्यात जाण्यास ६५ किलो मीटर अंतर पार करावे लागते.
( गुगल मॅप लोकेशन )
इतरही काही मार्ग आहेत. पुणे – जामखेड गाडी आहे, मुंबई – जामखेड गाडी आहे, नगर -कोमळी गाडी आहे. पुणे – भिगवण खेड राशीन रेहेकुरी या मागनिसुद्धा जाता येते. पुणे – दौड – श्रीगोंदा-बालवड या मार्गाने देखील. जाता येते.
रेहेकुरी हे काळवीटांकरिता प्रसिद्ध असलेल्या अभयारण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने १९८० मध्ये अंमलामध्ये आली. या अभयारण्याचे क्षेत्र सुमारे २१७.३१ हेक्टर एवढे आहे.
अभयारण्यात फेरफटका मारताना आपल्याला पक्ष्यांचे गोड आवाज ऐकायला मिळतात. तसेच आपल्याला मोर, लांडोर, बुलबुल, मैना, खंड्या, सुतार हॉर्नबिल, माळढोक अशा कितीतरी पक्ष्यांचे दर्शन घडते.
काही वर्षापूर्वी काळवीट हा प्राणी नामशेष होण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु पारसनीस नावाच्या शासकीय कार्यक्षम अधिलान्यांमुळे रेहेकुरी अभयारण्यामध्ये जिवंतपणा आला. त्यांनी सादर केलेल्या योजनेला यश प्राप्त झाले. महाराष्ट्र शासनाचाही तितकाच महत्त्वाचा सहभाग कारणीभूत ठरला.
निसर्ग आणि प्राणी संपत्ती
येथील उत्तम व्यवस्थेमुळे निसर्गप्रेमींना या ठिकाणी आनंकवा आस्वाद घेणे अधिक सोयीस्कर व सुखकर झाले आहे.
काळवीट
काळवीट म्हणजे काळे हरिण. हा आपल्या भारतामध्ये आढळणारा प्राणी आहे. हे काळे हरिण दिसायला देखणे आहे. याच्या शरीराच्या बांधणीमुळे सुरेख दिसते. या प्राण्याचे शरीर सडपातळ व बांधेसूद असते
या प्राण्याची चाल डौलदार असते. काळवीट या प्राण्याची शिंगं, हा एक आकर्षणाचा भाग आहे. हा अत्यंत चपळ आहे. काळवीट या प्राण्याचे खाद्य म्हणजे कोवळे गवत. याला भरपूर कोवळे गवत मिळाले की स्वारी खुशीत असते. येथील अभयारण्यामध्ये पवना, कुंदा, हॅमटा अशा प्रकारच्या गवताची जोपासना केली आहे.
हिवराच्या झाडीमधे मनसोक्त आनंद लुटताना, पळताना, बागडताना हरिणांना पाहताना आपल्याला एक सुखद आनंद मिळतो. असे वाटते की तासंतास हे दृश्य पाहत बसावे. प्राण्यांच्या विविध प्रकारच्या हालचाली आपल्या डोळ्याने टिपणे हाही आनंद वेगळाच. याला म्हणतात निसर्ग प्रेम.
काळवीट हा कळपाने राहणारा प्राणी आहे. यांच्या एका कळपात साधारण २० ते २५ काळवीटांची संख्या असते. यांच्या एका कळपामध्ये एकच नर असतो. या प्राण्याची दृष्टी उत्तम असते.
याची श्रवणक्रियाही उत्तम असते कोणत्याही गोष्टीचा वास याला पटकन समजतो. या प्राण्यांना एखादा धोका निर्माण झाला तर त्यावेळेस त्यांच्या शरीराची हालचाल पाहावी. हा प्राणी एका उडीमध्ये साधारण ५ ते ६ मीटर अंतर पार करतो.
हा प्राणी ताशी साधारण ६० किलो मीटर वेगाने धावू शकतो. हा एक चपळ प्राणी आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना काळवीटांप्रमाणे निसर्गाचे वैभव पाहयला मिळते. निलगिरी, बाभूळ, खैर, हिवर अशा कितीतरी प्रकारच्या वनस्पतींचे दर्शन घडते.
ससे, लांडगे, खोकड, कोल्हा असे विविध प्रकारचे वन्यपशूही पर्यटकांना पाहयला मिळतात. चिंकारा, चौशिंगा व काळवीट या तिन्ही प्राण्यांपैकी फक्त काळवीट भारतात सर्वत्र आढळते. चिंकारा व चौशिंगा हे भारतात काही ठराविक भागातच दिसते.
महाराष्ट्रात सातारा, नगर, बुलढाणा, परभणी ह्या भागात काळवीट आढळतात. काळवीटाचा कळप साधारण तीस ते पन्नास जणांचा असतो. पूर्वी शेकडोच्या संख्येने दिसत.
काळवीट या प्राण्यास खुरट्या झुडपाचे जगल व साधारण गवताचा सपाट भागाचा प्रदेश आवडतो. सहसा काळवीट हा प्राणी दाट जंगलात जात नाही. हा प्राणी गवत, चारा, निरनिराळी पिके यावर तो आपला उदरनिर्वाह करतो.
फेब्रुवारीत काळवीट मदावर येऊन त्याच्या समागमाचा हंगाम सुरू होतो. या काळामध्ये नर भांडखोर होतात. त्यांच्या चालण्यामध्ये एक प्रकारचा ताठरपणा व डौलदारपणा आढळतो. ते आपले डोके किंचित झुकवून चालतात. साहजिकच शिंगे पाठीला टेकल्यासारखी वाटतात.
काळवीटाच्या डोळ्याजवळील उभ्या रेघेसारखी ग्रंथी पूर्णपणे उघडली जाते. एक प्रकारे आव्हानात्मक आवाज करतात. एका वेळेस दोन पिले जन्मास येतात.
मादी आपल्या पिलांचे संगोपन उत्तम करते. गवतात पिलांना लपवते. पिलांना शक्ती आली की ती कळपात दाखल होतात.
पूर्णपणे वाढ झालेला नर काळवीट जमिनीपासून साधारण पावणेतीन फूट भरतो. त्याचे वजन साधारण ४० कि. ग्रॅ. भरते. त्याची शिंगे १० ते १५ इंच असतात.
दक्षिण भारतामध्ये दिसणाऱ्या काळवीट या प्राण्याची शिंगे उत्तर भारतातील काळवीटापेक्षा जास्त लांब असलेली आढळतात.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- भीमाशंकर अभयारण्य माहिती | BHIMASHANKAR SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- कोयना अभयारण्य माहिती | KOYNA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- रेहेकुरी अभयारण्य माहिती | REHEKURI SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- गौताळा अभयारण्य माहिती | GAUTALA SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- चांदोली अभयारण्य मराठी माहिती | CHANDOLI NATIONAL PARK INFORMATION IN MARATHI
- सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- राधानगरी अभयारण्य माहिती | RADHANAGARI ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI
- अनेर डॅम अभयारण्य माहिती | ANER DAM WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- तानसा अभयारण्य माहिती | TANSA WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- किनवट अभयारण्य माहिती | KINWAT WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- मेळघाट अभयारण्य माहिती | MELGHAT TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- बोर अभयारण्य माहिती | BOR TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- नागझिरा अभयारण्य माहिती | NAGZIRA TIGER RESERVE INFORMATION IN MARATHI
- मायणी अभयारण्य माहिती | MAYANI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI
- नांदूर मधमेश्वर अभयारण्य माहिती | NANDUR MADHYAMESHWAR BIRD SANCTUARY PARK INFORMATION IN MARATHI
- जायकवाडी पक्षी अभयारण्य माहिती | JAYAKWADI BIRD SANCTUARY INFORMATION IN MARATHI