रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI

रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “रोहिडा किल्ला माहिती” म्हणजेच “ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

रोहिडा किल्ला माहिती व ठिकाण

भोरच्या दक्षिण दिशेला रोहिडा सुमारे ३.१८ कि.मी. वसलेला आहे. भोरमार्गे बाजारवाडीस जाण्याकरिता जो रस्ता आहे तेथून गडावर जाण्यास वाट आहे.

वायव्येला असलेला जो दांडा आहे तेथून त्याची चढण सुरू होते. तासभर चाललो की आपण किल्ल्याच्या प्रथम दरवाज्यापाशी येऊन पोचतो. ( गुगल मॅप लोकेशन )

दरवाजा चौकटीला भक्कम अशी गणेशपट्टी आहेच, पण त्यावर महिरपट्टी आहे. दुसऱ्या दरवाज्याच्या दोन्ही अंगास सिंह व शरभ यांची शिल्पे आहेत. उजव्या अंगाला पाण्याचे एक टाके आहे.

तिसऱ्या दरवाज्याच्या दोन्ही अंगाला अर्धव्यक्त हत्ती आणि त्याखाली अनुक्रमे मराठी व पार्शीत लेख आहेत.

या रोहिडयाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १०९० मीटर आहे.

रोहिडा किल्ल्याची रचना

पश्चिम दिशेला भैरवाचे देऊळ, पाण्याचे टाके, दीपमाळ आणि काही चौरस आकाराचे दगड आहेत.

अशा चौरस आकाराच्या दगडावर शिवलिंग किंवा पादुका = असतात, परंतु येथील चौरसांवर लहान कळस आहे.

सदरेच्या व देवळासमोर नगारा आणि नौबत यांची तांब्याची भांडी आहेत.

किल्ल्याला फार मोठी सपाटी नाही. रोहिड्यावर तळी, बुरुज, तट यांव्यतिरिक्त फारसे अवशेष नाहीत. पहिल्या तीन बुरुजांची नावे रक्षण करणाऱ्या घराण्यांनुसार पडली आहेत.

या गडाला प्रत्येक बुरुजाखाली एक एक मेट असून त्या प्रत्येकास बुरुजाचेच नाव देण्यात आले होते.

ही मेटे आज नामशेष झालेली आढळतात.

बुरुजांची नावे पुढीलप्रमाणे होत. शिखला, पाटणे, दामगुडे, वाघजाई, शझ्झा, फते आणि सदरेचा बुरुज अशी होत.

पूर्वी या गडाला आणखी वाटा नसाव्यात असे वाटते. गड पाहण्यास फार वेळ लागत नाही.

ऐतिहासिक निर्देश

कान्होजी जेधे यांचेकडे भोसरी पूर्ण तसेच रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिङ्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते.

रोहिडा शिवाजीमहाराजांच्या ताब्यात आल्यावरही त्यांचे अधिकारी ३० च होन घेत होते.

मागला पाच हजार टक्क्यांचा दाखला लक्षात आल्यावर शिवाजीमहाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीमहाराजांकडे विचारणा केली की, ३०च होन घ्यायचे ? शिवाजीमहाराजांनी निर्णय दिला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे त्यांजकडून पूर्वापार चालत आले असेल तेवढेच द्रव्य घ्यावे.

दादोजी कोंडदेव गेल्यावर शिवाजीराजांनी अनेक विजापुरी किल्ले हस्तगत केले त्यापैकी रोहिडा एक होय.

कै. वि. का. राजवाडे यांनी भा. इ. सं. मंडळाच्या १८३६ च्या इतिवृत्तात पृ. ३४ वर श. १५८९ आषाढ शु. २ ( इ. १६६७ जून १३ )

या दिवशी बहुधा शिवाजीराजांनी रोहिडा घेतला असावा असे सांगितले आहे.

याअगोदर शिवाजीराजे आन्याहून निसटून आले कहोते, त्यामुळे राजवाडे यांची मिती बरोबर नसावी असे मला वाटते.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा