सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI

सागरेश्वर अभयारण्य माहिती | SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही सागरेश्वर अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच SAGARESHWAR ABHAYARANYA INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

सागरेश्वर अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर येथे जायला पुणे – मिरज गाडीने ताकारी या स्टेशनला उतरावे व तेथूनच ५ कि. मी. अंतरावर असलेले सागरेश्वर अभयारण्यात जावे.

गुगल मॅप लोकेशन )

एक निसर्गप्रेमी श्री. धो. म. मोहिते व महाराष्ट्र शासन या दोघांमुळे या अभयारण्याची स्थापना होऊ शकली. पर्यटकांना राहण्याकरता निवास व्यवस्था असल्याने सुखकर झाले आहे.

या अभयरण्याच्या निर्मितीत सुमारे ११ वर्षाचा दीर्घकाळ लोटला. सन १९८१ मध्ये याची स्थापना झाली.

सागरेश्वर, परिमलील, नागेश्वर, लिंगेश्वर व कमळभैरव ही या भागातील धार्मिक श्रद्धास्थाने आहेत.

सागरेश्वराचे आकर्षण, वनश्री, पक्षी व प्रामुख्याने मृगविहार यामध्ये आहे.

३४ हेक्टर जागेत व्यवस्थित रचना करून साकारलेले मृगविहार पाहताना मन प्रसन्न होते. विविध प्रकारच्या हरणांमुळे ते पाहताना आपला वेळ कसा जातो ते कळत नाही.

सांबर हा प्राणी पाहवयाचा असेल तर या ठिकाणी अवश्य जायला हवे.

महाबळेश्वरचा सनसेट पाहण्याचा हजारो पर्यटक आनंद लुटतात तसा या ठिकाणचा सूर्यास्त या ठिकाणातील डाक बंगल्याच्या येथून

पाहण्यासारखा आहे. दरवर्षी किमान २५ हजार पर्यटक सागरेश्वरास येतात आणि निसर्गात न्हाऊन निघतात.

पर्यटकांची निवास व्यवस्था असल्याने सुखकर वाटते.

मुलांकरताही बालोद्यान आहे. निसर्गानी नटलेल्या सागरेश्वराला एकदा तरी अवश्य भेट द्यावी.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा