सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI

सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही सज्जनगड ची माहिती मराठी म्हणजेच SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे.  सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे. या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

सज्जनगड ची माहिती मराठी व ठिकाण

सातारा जिल्हयातील सज्जनगड आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी उभा आहे. ( गुगल मॅप )

सज्जनगडावर अनेक घटना घडल्या. महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर निरनिराळ्या कालमानानुसार घटना घडत गेल्या.

पुढे हेच गड प्रत्येकाच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे लोकांचे लक्ष वेधू लागले. हल्ली निसर्गाची गोडी विशेष वाढीस लागली आहे.

उरमोडी नदीच्या तीरावर परळी, सातारा, सज्जनगड असा हा मार्ग होय.

हल्ली थेट गडावर जाता येते. अनेक भक्तांमुळे आज गडावर सुधारणा झालेल्या आहेत. थेट वरपर्यंत पायांनी जाता येते.

मध्यमार्गाजवळ देवळीत कल्याणस्वामीची चांगली प्रतिमा आहे.

सज्जनगड किल्ल्यावरील स्थळे व ऐतिहासिक निर्देश

किल्ल्याला प्रमुख दोन दरवाजे आहेत. दोन्ही दरवाजाला जोडणाऱ्या पायऱ्या – चढून गेल्यावर गडाचा माथा आपल्याला दिसतो.

श्रीराम मंदिर, श्रीसमर्थांची समाधी, श्रीधरस्वामींची कुटी, प्राचीन अंगलाईचे देऊळ इत्यादी आपल्याला गडावर दिसते. इ.स. १६७३ मध्ये हा गड शिवाजीराजांनी घेतला.

रामदासस्वामीच्या वेळेस अनेक धार्मिक वृत्तीचे अभ्यासक गडावर यायचे, शिवाजीराजांचे ज्यावेळेस निधन झाले त्या वेळेस समर्थ रामदासांना अत्यंत दुःख झाले.

समर्थ उदास झाले. एकंदरीत या गडावर बऱ्याच गोष्टी पाहयला मिळतात.

समर्थांचा पलंग, समर्थांचा मठ, समर्थांची कुबडी, समाधी अशा अनेक गोष्टीमुळे समर्थाच्या भक्तांचा सारखा राबता आहे.

अलीकडे पूर्वीपेक्षा गडावर बऱ्याच सुधारणा झालेल्या आढळतात.

याला कारण समर्थांचे भक्त होय. पुणे ते सज्जनगढ़ अशी थेट बससेवा सुरू झाली आहे ही एक चांगली गोष्ट होय. देवळाचा परिसर स्वच्छ ठेवल्यामुळे भाविकांना दर्शन घेताना प्रसन्न वाटते.

येणाऱ्या भाविकांकरिता उतरण्यास खोल्या बांधलेल्या आहेत, तेथे भोजनाची सोयही करण्यात येते. सन् १८१८ नंतरही गडावर इंग्रजांची एक फलटण राहिली होती.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा