शब्द हरवले तर मराठी निबंध | SHABD HARVALE TAR ESSAY IN MARATHI

शब्द हरवले तर मराठी निबंध | SHABD HARVALE TAR ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “शब्द हरवले तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये SHABD HARVALE TAR ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • शब्दांचा विचारपूर्वक वापर करणे
  • तोंडातून एकही शब्द बोलता न येणे
  • शिकवणार कसे?
  • शब्द हरवणे
  • भाषण कसे करणार?
  • भावना व्यक्त न करता येणे

शब्द हरवले तर मराठी निबंध | SHABD HARVALE TAR ESSAY IN MARATHI

आज सकाळी माझा मोठा भाऊ झोपेतून उठला. तेव्हा त्याला बोलताच येत नव्हते. हातवारे करून तो बोलण्याचा प्रयत्न करोत होता. दिवसभर त्याच्या न बोलण्यामुळे आम्ही हैराण! कारण त्याच्या हातवाऱ्यांचा अर्थ लावणे आम्हा सगळ्यांना कठीण जात होते.

खरंच! दिवसभर तोंडातून एकही शब्द बाहेर न पडणे ही शिक्षाच म्हणायला हवी! आमच्यामुळे जगणे कठीण होते ना? आम्ही हरवलो तर तुमचे कसे होईल? मी दचकून पाहिले तर, शब्द माझ्याभोवती पिंगा घालत होते. म्हणत होते, आम्ही हरवलो तर तुमचे कसे होणार?

सगळे पशु-पक्षी जसे आमच्याशिवाय गप्प आहेत तसे, तुम्ही गप्प राहणार.

आम्ही हरवल्यामुळे तुम्ही रडू शकणार नाही. ओरडू शकणार नाही. मनातल्या भावना व्यक्त करू शकणार नाही. सगळे रस्ते, बाजार, सभा इत्यादी ठिकाणचा आवाज बंद होणार!

आजारी माणसांची, पाहुण्यांची विचारपूस कशी करणार संध्याकाळी दूरदर्शनवर फक्त खाणाखुणाच पाहाव्या लागतील कविता, गायन, नाटक, चित्रपट हे सगळे मुके होऊन जातील. शब्दाशिवाय सारे चिडीचूप होईल.

गप्पा मारणे, वाद घालणे, कधी कधी भांडण करणेसुद्धा आवश्यक असते. त्यामुळे शब्द हरवून चालणार नाही. शब्द जपायलाच हवेत.

याचा एक चांगला परिणाम मात्र होईल. ध्वनिप्रदूषण थांबेल. पण फक्त कल्पना करा… भाषण करताना नेता कसा शाळेत शिकवताना शिक्षक कसे दिसतील? आपापसात भांडण करताना आपण कसे दिस? नुसत्या कल्पनेने ना?

मी हरवू नये असे वाटत असेल तर माझा छान उपयोग करा. कोणाची मने दुखवू नका. आम्हांला तुमच्यासोबत राहायला निश्चित आवडेल.

हे निबंध सुद्धा वाचा –