शेतकरी मनोगत निबंध | SHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI

शेतकरी मनोगत निबंध | SHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI | शेतकऱ्यांचे मनोगत | मी शेतकरी बोलतोय निबंध | शेतकऱ्याचे मनोगत | शेतकऱ्यांचे मनोगत निबंध मराठी | दुष्काळग्रस्त शेतकरी मनोगत निबंध मराठी – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “शेतकरी मनोगत निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल. 

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत यावर सविस्तर निबंध मिळेल, या निबंधामध्ये ,शेतकऱ्याचे मनोगत, अडी-अडचणी, कष्ट या मुद्द्यावर विसतृत चर्चा केलेली आहे.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • छोटा शेतकरी
  • थोडी जमीन
  • काळी आई
  • लहरी पाऊस
  • आकाशाकडे डोळे
  • पहिला पाऊस
  • सगळे काही पावसावर अवलंबून

शेतकरी मनोगत निबंध | SHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI

शेतकऱ्यांचे मनोगत | मी शेतकरी बोलतोय निबंध | शेतकऱ्याचे मनोगत | शेतकऱ्यांचे मनोगत निबंध मराठी | दुष्काळग्रस्त शेतकरी मनोगत निबंध मराठी

मी आहे एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोसल्या गेल्या आहेत. या जमिनीवर माझे जिवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार?

पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर, म्हणजे आपल्या पावसावर! आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी नाही. लहानसहान नद्यांना पाणी असते, पण तेही पावसावर अवलंबून, उन्हाळ्यात त्यापण आटून जातात. त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात.

कुठे दिसतोय का आमचा काळा विठोबा! म्हणजे काळा ढग हो! शेतं नागरून ठेवायची, कार्टकुटं काढायचं, ढेकळे फोडायची आणि पावसाची वाट बघत राहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नाही. चार-चार, पाच-पाच कोसांवरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.

मग कधीतरी अवचित मळभ येतं, अंग गदगदून निघतं. सोसाट्याचं वारं सुटतं. इतक्यात पावसाचे थेंब टपयप गळू लागतात. क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. लहानमोठी, म्हातारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात. पावसात फक्त शरीरंच भिजतात, असं नाही; तर मनही निवतात.

आता शेतीला लागायला हवं. भिजलेल्या जमिनीत बी-बियाणं टाकायला हवं. पाऊसराजाने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून असते ते त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिळतील ते दाणे. त्यावर सगळे वर्ष काढायचं, हेच आम्हां कोरडवाहू शेतकऱ्यांचं नशीब! पोळा झाला की पाऊस सरला.

उरलेल्या आठ महिन्यांत दुसरं पीक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी, वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्रय! कायमची उपासमार! काय करणार? मग बँकेतून कर्ज घ्यावे लागते. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो.

आमच्या गावापासून थोड्या अंतरावरून मांजरी नदी वाहत आहे. इकडच्या भागातील नद्घांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि कालव्यांच्या मदतीने तिचं पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावचा किती फायदा होईल! आम्ही पण दोन पिकं काढू शकू, बागायत करू शकू; पण हे आमचं मनोगत कधी पुरं होणार? परमेश्वरच जाणे! ..

यूट्यूब व्हिडिओ

शेतकरी मनोगत निबंध | SHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI | शेतकऱ्यांचे मनोगत | मी शेतकरी बोलतोय निबंध | शेतकऱ्याचे मनोगत | शेतकऱ्यांचे मनोगत निबंध मराठी | दुष्काळग्रस्त शेतकरी मनोगत निबंध मराठी या बरोबरच खालील निबंध सुद्धा वाचा.

हे निबंध सुद्धा वाचा-