शिवनेरी किल्ल्याची माहिती | SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI –
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “शिवनेरी किल्ल्याची माहिती” म्हणजेच “SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
शिवनेरी किल्ल्याची माहिती व ठिकाण
शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावाजवळ आहे. ( गुगल मॅप लोकेशन )
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास तीर्थाचे माहात्म्य प्राप्त झाले आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचाही मुक्काम या किल्ल्यावर काही काळ होता.
शिवनेरी किल्ल्याचे वर्णन करताना, शिवभारतकाराने ‘हा किल्ला निजामशहाचा आवडता, यशस्वी आणि बळकट आहे.
जणू काय दुसरा देवगिरी (दौलताबाद) म्हणून लोकविख्यात होता असे लिहिले आहे.
किल्ल्याची रचना
शिवनेरी हा किल्ला सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिणोत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे.
दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती तर उत्तरेकडे तो निमुळता होत पहिल्या दरवाजाने आपण पुढे गेलो की डावीकडे मांग बुरूज लागतो.
भिंत सुमारे २ मीटर उंचीची आहे. त्या ठिकाणी बंदुकी रोखण्यास भिंतीमध्ये मोठी छिद्रे केली आहेत. यानंतर लागणारा दुसरा दरवाजा म्हणजे ‘परवानजीचा दरवाजा होय.

येथील कमानीच्या दोन्ही बाजूस त्या काळातील दोन शिल्पे आहेत. तिसऱ्या दरवाज्यास हत्ती दरवाजा म्हणतात, याच्या भिंती सुमारे ७ मीटर उंचीच्या आहेत.
यापुढील लागणारा ‘पीराचा दरवाजा इतर सर्व दरवाजांपेक्षा उत्तम बांधणीचा व भक्क आहे. येथे जवळच एक पीर आहे. या ठिकाणी जवळपास काही घरांचे अवशेष व पोड्यांचा तबेला आहे. यानंतर आपणास ‘शिवाबाई’ नावाचा दरवाजा लागतो.
त्यावर मोठ्या आकाराचे लोखंडी खिळे ठोकलेले आहेत. या ठिकाणाहून दोन वाटा फुटतात. एक किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यास व दुसरी शिवाई मंदिराकडे जाते.
शिवाई मंदिर दगडी असून त्याचा चौथरा सुमारे पाच मीटर रुंद आहे. आतील सभामंडप दोन रांगात प्रत्येकी पाच लाकडी खांब आहेत.
गडावरील सहावा दरवाजा फाटक दरवाजा व सातवा दरवाजा कुलापकर दरवाजा होय.
या ठिकाणी गंगा-जमुना नावाच्या दोन प्रचंड गार पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्या यादवकालीन असाव्यात.
शिवनेरीवरील स्थळे
आपल्याला गडावरील जुन्या अवशेषांपैकी सदरेची जागा, अंबरखाना, मुसलमानी अमदानीतील मशीद, सरदारांची निवासस्थाने, घोड्याची पागा हे पहावयास मिळते. शिवनेरी हा राष्ट्रकूट राजवटीच्या वेळेस बांधला असावा. १४४३ मध्ये हा किल्ला मलिक-उल-तुजार या बहामनी सरदाराने यादवांच्याकडून घेतला.
१६५७ मध्ये श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जुन्नरवर हल्ला करून ३,००,००० सोन्याच्या मोहरा, २०० घोडे, उंची कपड़े व इतर मौल्यवान वस्तू मिळवल्या.
१६७० मध्ये शिवाजी राजांनी पुन्हा हल्ला केला असता तो अयशस्वी ठरला. १६७५ मध्ये शिवनेरीवर प्रयत्न केला. परंतु आपले जन्मस्थान ‘शिवनेरी’ हे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत जिंकता आले नाही.
१६७८ मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली फौज पाठवून जुन्नर वेढले व रात्री माळा लावून लोक किल्ल्यावर चढविले.
परंतु शत्रु सावध होऊन लढाई झाली व गडावर चढलेल्या मराठ्यांची कत्तल झाली.
ऐतिहासिक निर्देश
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या किल्ल्यांचे स्मरण झाले की, प्रथम आपल्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराजांची मूर्ती उभी राहते.
शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरीस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या किल्ल्यास पूर्वी यज्ञनगर अथवा जुनेनगर या नावाने ओळखत असत.
दि. १९-२-१६३०(शुक्रवार) रोजी जिजाईच्या पोटी शिवाजी राजांचा जन्म झाला. जिजाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. गडावर आनंदी आनंद झाला होता.
आजची गडावरची स्थिती
महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी गडावर एक भव्य मंडप बांधला असून त्यास ‘शिवकुंज’ असे नाव दिले आहे. त्यामागील गाभाऱ्यामध्ये सिंहासनावर विराजमान झालेल्या जिजामाता व त्यांच्या पुढे तलवार घेतलेले बाल शिवाजी यांची पंचधातूंची सुंदर मूर्ती बसवली आहे.
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने जुन्नर परिसरातील बारकाईने अभ्यास केल्यास व उत्खनन केल्यास अनेक नव्या गोष्टीवर प्रकाश पडेल.
आटोपशीर पण स्मरणात राहणारा हा शिवनेरी किल्ला पहायला आपल्याला एक दिवस पुरेसा होतो.
पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानकातून जुन्नरला जाण्यास एस.टी. महामंडळाच्या बसेस आहेत.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI
- सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI
- राजगड किल्ला माहिती मराठी | RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI
- तोरणा किल्ल्याची माहिती | TORNA FORT INFORMATION IN MARATHI
- रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI
- चाकण किल्ला इतिहास | CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI
- शिवनेरी किल्ल्याची माहिती | SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI
- लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI
- सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI
- चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI
- वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI
- अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI
- प्रतापगडाची माहिती | PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI
- रायगड किल्ला माहिती | RAIGAD FORT INFORMATION IN MARATHI
- कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI
- जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI
- लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI
- गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI
- हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI
- धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI
- पन्हाळगड किल्ला मराठी माहिती | PANHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI
- विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- देवगिरी किल्ला माहिती | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI
- सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI
- सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI