सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी म्हणजेच SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी व ठिकाण

मालवणला पुण्याहून तसेच आपल्याला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत मुंबई-गोवा मार्गावर मुंबईहन मालवण अंदाजे ३०५ कि.मी अंतरावर आहे.

गुगल मॅप लोकेशन )

आपण मालवण बंदरामध्ये उभे राहिलो की नैॠत्य दिशेला सुमारे दोन कि.मी. अंतरावर भर समुद्रामध्ये कुरटे हे बेट आहे. त्या सुंदर बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आपल्याला उभा असलेला पाहायला मिळतो.

मालवणला उतरून बंदरात यावे. संपूर्ण किल्ल्यापर्यंत जाण्याकरिता जलमार्ग खडकांनी दाटलेला आपणास पाहावयास मिळतो.

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे येथील माहीतगार व जाणकार लोकच फक्त नागमोडी वळणाने पड़ाव शेवट पर्यंत नेऊ शकतात.

आपल्याला वाटेमध्ये पडलेल्या स्थितीतील पद्मदुर्ग गढी लागते तेथून किल्ल्यापर्यंत पोचलो की किल्ल्याला लागूनच असलेल्या तेथील धक्क्यावर आपण उतरतो.

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी ऐतिहासिक निर्देश

शिवाजीमहाराजांनी कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग इ. किल्ले हस्तगत केले. परंतु त्याहूनही बलाढ्य अशा जलदुर्गाची उणीव प्रामुख्याने जाणवत होती.

जंजिऱ्याचा सिद्दी तसेच इंग्रजांना जरब बसावी असे शिवाजीराजांना सारखे वाटत होते. बारकाईने किनारपट्टी संपूर्णपणे पाहताना कुरटे बेट राजांच्या नजरेत भरले ही एक चांगलीच गोष्ट घडली.

त्यांनी बंदरावरील एका खडकावर सूर्य, चंद्र, शिवलिंग, समुद्रदेवता, गणपती इ. देवतांचे पूजन करून किल्ल्याच्या बांधकामास प्रारंभ केला.

(१० नोव्हें. १६६४) तटाचा पाया ज्यावेळेस भरला त्यावेळेस त्यात शिशाचा रस ओतण्यात आला.या किल्ल्याच्या तटाचे काम अहोरात्र जवळजवळ तीन वर्षाहून अधिक काळ चालले होते.

कामगारांचा विचार करता तीन हजार कसबी तसेच कामाठी काम करीत होते. किल्ल्याच्या १८ हेक्टर क्षेत्राभोवती सुमारे ३ कि.मी. लांबीचा मजबूत असा तट बांधलेला आहे.

तट सर्पाकृती असून याला बावन्न बुरुज आहेत. तटाची उंची सुमारे ११ मीटर असावी.

सिंधुदुर्ग पर्यटन स्थळे व रचना

पूर्व दिशेला या किल्ल्याचे महाव्दार आहे ते वळणावळणाचे आहे. आत प्रवेश करता तळात एक व तटावर एक घुमट्या आहेत.

तेथील तळामधील घुमटीमध्ये शिवाजीमहाराजांच्या डाव्या पायाचा ठसा उमटलेला आपणास अगदी स्पष्टपणे दिसतो. उजव्या हाताचा ठसा मात्र मोकळ्या ठिकाणी असल्याकारणाने साहजिकच तो तितकासा स्पष्ट दिसत नाही.

मारुती, भवानी, महापुरुष, जरीभरा महादेव अशी मंदिरे तसेच साखरबाव, दूधबाव, दहीबाव अशा विहिरी, महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, कामगारांचे वाडे इ. बांधकाम केलेले दिसते. त्या काळात एक कोटी होन इतका खर्च आला.

किल्ल्यात राजाराममहाराज यांनी बांधलेले शिवछत्रपतींचे देऊळ आहे. आजच्या पंधरा ते वीस घरे नांदत आहेत. महाराजांचा राहता वाडा आता पडलेला आहे.

तटावर आपण उभे राहिलो तर प्रचंड सागराचे पाणी तटालाधडका देताना दिसते. पश्चिम दिशेला सतत पाण्याच्या माऱ्यामुळे एक भले मोठे भ दाड पडलेले आहे. दक्षिण दिशेस निवतीचा खडक आपल्याला दिसतो.

पडावाने किल्ल्यात आत जावे, शिवाजीराजांची तलवार पहावी, मंदिरात जावे. पाण्याची कमतरता नाही. पश्चिमेस असलेला असा समुद्र मनसोक्त पहावा.

मन स्वच्छ होते. दक्षिणेकडील जी दिंडी आहे त्या जागेस राणीची वेळ असे संबोधिले जाते. ( राणीच्या स्नानाचे स्थान )

गिरीप्रेमी मंडळींनी सिंधुदुर्ग अगदी आवर्जून पहावा आणि निसर्गाची मजा लुटावी. किल्ल्यामध्ये खाण्याचे पदार्थ वा उपहारगृह नाही.

किल्ल्यास निरोप देताना अथांग समुद्र आपल्याला सुखद आनंद देतो.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा