सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI

सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “सिंहगड किल्ल्याची माहिती” म्हणजेच “SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे. या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

सिंहगड किल्ल्याची माहिती व ठिकाण

पुण्याजवळ असलेले दोन किल्ले म्हणजे पुरंदर आणि सिंहगड. हा गड पुण्याच्या नैऋत्य दिशेला २४ कि.मी. अंतरावर आहे. खडकवासला धरण सोडले की आपण डोणजे या गावापाशी येतो. हे गाव गडाच्या पायथ्याशीच आहे. आता तर पुणे-डोणजे अशी सारखी बस आहे. पुणे-सिंहगड अशी पी. एम. टी. बससुध्दा दर अर्ध्या तासाला आहे. पूर्वीपेक्षा आता गडावर जाण्यास सोय चांगलीच झाली आहे. गडावर हिवाळा व उन्हाळा या दिवसात भरपूर गर्दी असते. ( गुगल मॅप लोकेशन )

सिंहगड रचना

गडाची उंची १३१७ मीटरआहे. डोणजे गावाच्या पुढे चढावाला लागलो की ६७० मीटर चढावे लागते. कल्याण गावाकडील चढ़ सोपा आहे. आता थेटपर्यंत डांबरी सडक झाली आहे. वाहनाने गेल्यास पार गडापर्यंत जाता येते. सिंहगडाचे नाव घेतले वा आपण गडावर गेलो की आपल्यासमोर नरवीर तानाजी उभा राहतो. सिंहगड जिंकण्याकरता तानाजीने शर्थ केली पण महाराजांचा आवडता तानाजी लढाईत मारला गेला.

शाळेतील, कॉलेजातील बरेच विद्यार्थी सहलीला सिंहगडावर वारंवार येतात आणि मनसोक्त आनंद लुटतात. सकाळी निघालो, की संध्याकाळपर्यंत आपण परी येऊ शकतो. देवटाक्याचे गार स्वच्छ पाणी, भरपूर मोठा परिसर, मोकळी हवा : त्यामुळे गडावरचे वातावरण मोठे सुरेख अनुभवायला मिळते. पूर्वीपेक्षा या भागात बऱ्याच सुधारणा झाल्याचे आपल्याला आढळून येते. सिंहगडाची मूळ रचना सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी झाली असावी. राजे जयसिंग यांचेशी झालेल्या तहाप्रमाणे राजांना सिंहगड यावा लागला. ४ फेब्रुवारी१६७० मध्ये तानाजीने पराक्रमाची शर्थ केली आणि हा गड जिंकला. संभाजी राजे यांच्या निधनानंतर सिंहगड पुन्हा मोगलांनी घेतला. औरंगजेबाकडून १ जुलै १६९३ मध्ये पुन्हा गड जिंकून घेण्यात मराठ्यांना यश आले. इ.स. १७०५ ते १८१८ पर्यंत सिंहगड हा मराठ्यांकडेच होता. गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्यामुळे सिंहगडाचे नाव आपल्या कायम लक्षात राहत.

सिंहगड किल्ल्याची माहिती व आजची गडावरची स्थिती

हा गड पाहण्याकरिता आपल्याला एक दिवस पुरेसा होतो. आपण चौफेर दिशेने हळूहळू बघू लागलो की आपल्याला अनेक गोष्टी पाहावयास मिळतात. उदा. घोड्यांच्या पागा, पाण्याची टाकी, रत्नमाळा, दारुखाना, लो. टिळकांचा प्रसिद्ध

बंगला, आणि महत्त्वाचे म्हणजे दूरदर्शन मनोरा. अनेक गोष्टींची नावे देता येतील, पण सांगण्यास वा लिहिण्यास वाईट वाटते की, आज गडावर एकही वास्तू व्यवस्थित अशी अस्तित्वात नाही, सर्व नेस्तनाबूत झालेले आहे.

सिंहगडावरील स्थळे व इतिहास

सिंहगडावर फेरफटका मारताना आपणास खालील ठिकाणे असलेली आढळतात.

 • कल्याण दरवाजा
 • डोणजे दरवाजा
 • तानाजीची समाधी
 • देव टाके
 • उदेभानाचे थडगे
 • गणेश टाके
 • जवाहिर खाना
 • माची
 • सतीचे दगड
 • राजाराम टाके
 • तटबंदी
 • राजारामाची समाधी
 • पागा
 • टेहळणी
 • बुरूज सुरुंगाची जागा
 • राजवाडा
 • अमृतेश्वर मंदिर
 • तानाजी कडा
 • ४ मेटे ( पहाऱ्याच्या जागा)

इत्यादी बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनास येतील.

सिंहगडाचे कागदोपत्री असलेले नाव कोंढाणा असे आहे. बोली भाषेतील उच्चार कोंडाणा असा आहे. तानाजीच्या प्रसंगानंतर सिंहगड असे किल्ल्यास नाव मिळाले ही समजूत चुकीची आहे. त्या अगोदरही सिंहगड हे नाव किल्ल्यास होते. पुण्यामध्ये महाराजांनी आपल्यासाठी बांधलेल्या सुंदर अशा लालमहालात मुक्काम ठोकून राहिलेल्या औरंगजेबाकडून आलेल्या सुभेदार शाहिस्तेखानावर इ.स. १६६३ एप्रिल ५ या तारखेला रातोरात छापा घातला. या प्रसंगात खानाची कशी दुर्दशा झाली हे सर्वांस माहीत आहे. सिंहगडावरूनच महाराज आले व या प्रसंगानंतर पुन्हा ते सिंहगडावर गेले.

ऐतिहासिक निर्देश

पेशवाईत सुरक्षिततेसाठी सिंहगडाचा उपयोग करीत असत. त्याप्रमाणे मातब्बर कैदी यांना ठेवण्याकरिताही या गडाचा उपयोग करीत. इ.स. १७५० नंतरच्या सुमारे ७० वर्षाच्या काळात बऱ्याच जणांना या ठिकाणी कैद करून ठेवले होते. त्यापैकी काही नावे अशी- रामचंद्र परांजपे, बाळाराम गार्दी, चिंतो रायरीकर, आनंद दामले इ.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा