सूर्य मावळला नाही तर मराठी निबंध | SURYA MAVALA NAHI TAR ESSAY IN MARATHI

सूर्य मावळला नाही तर मराठी निबंध | SURYA MAVALA NAHI TAR ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “सूर्य मावळला नाही तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये SURYA MAVALA NAHI TAR ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • उन्हाळ्याचे दिवस
  • पृथ्वीची समजूत काढणे
  • सूर्य न मावळणे
  • जगणे कठीण
  • झोप मिळणार नाही
  • उष्णतामान वाढणे

सूर्य मावळला नाही तर मराठी निबंध | SURYA MAVALA NAHI TAR ESSAY IN MARATHI

उन्हाळ्याचे दिवस होते. उकाड्याने जीव हैराण झाला होता. आकाशातील सूर्याकडे पाहण्याचे धैर्य होत नव्हते. अशा वेळी मनात एक भीती डोकावली, ‘हा सूर्य मावळलाच नाही तर…”

सूर्य मावळला नाही, तर सूर्य उगवणार कसा? रात्र झाली नाही, तर दिवस होणार कसा? कालचक्र थांबेल. रम्य पहाट अनुभवता येणार नाही. रात्रीच्या अंधारात चांदोबा आणि त्याच्या चांदण्या यांची मौज लूटता येणार नाही.

सूर्य मावळलाच नाही, तर पक्षी आपल्या घरट्यांकडे कसे परतणार?

संध्याकाळ झाली नाही, तर कामावर गेलेली माणसे आपापल्या घरी कशी परत येणार? रात्र झालीच नाही, तर विसाया मिळणार नाही आणि सकाळचे चैतन्यही प्राप्त होणार नाही. सूर्य सतत तळपत राहिला, तर त्याची उष्णता असहय होईल.

नदीनाल्यांतील पाणी आटेल. कारण, पाण्याची सतत वाफ होत राहील. सर्व सजीवांना आपले जीवन जगणे कठीण होईल.

सूर्य मावळलाच नाही तर अंधार होणारच नाही. मग विजेचे दिवे लावण्याची गरज राहणार नाही. रात्र होणार नाही, अंधार होणार नाही, मग विजेच्या दिव्यांच्या रोषणाईची मजा कशी येणार? रात्र नाही म्हणजे झोप नाही.

झोपेविना माणसे अशी किती दिवस राहणार? शेवटी ती दिवसाची झोपू लागतील. पण सतत प्रकाशामुळे शांत झोपसुद्धा मिळणार नाही. घरांतील गृहिणींचे सर्वात जास्त हाल होतील. त्यांना सर्व मंडळींसाठी सारखे राबावे लागेल. विश्रांतीचा काळ येणार नाही.

सूर्य सतत तापत राहिला, तर उष्णतामान वाढत जाईल. थंडावा येणार नाही. फुले सुकून जातील. हैं माझ्या मनात आले की, आपल्या पृथ्वीवर सूर्य मावळला नाही, तर तो इतर कुठल्यातरी ठिकाणी उगवतहो नसणार. पृथ्वीच्या फिरण्यामुळे रात्रंदिवस हे चक्र सुरू असते. मग पृथ्वीच फिरायची थांबली तर नाहो ना?

शास्त्रज्ञ, संशोधक संशोधनाला लागतील. मग कुणीतरी वसुधेची समजूत काढेल, मग वसुधेला गती येईल आणि झटकन सूर्य मावळेल.

हे निबंध सुद्धा वाचा –