सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी” म्हणजेच “SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी व ठिकाण

रत्नागिरी हे नाव जरी उच्चारले तरी आपल्या डोळ्यासमोर जलदुगाची मालिकाच येते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग इ. पूर्णतः समुद्राने वेढलेल्या किल्ल्यांमध्ये सुवर्णदुर्गाची गणना होते.

या किल्ल्यांच्या तटांशी रात्रंदिवस सागराचे पाणी धडका देते. फेसाळणारे पाणी, लाटांच्या रेषा, लाटांचा आवाज अशी पाण्यातील आगळीवेगळी गंमत पाहिली की मन आनंदाने भरून येते.

ज्यावेळेस पाण्याला भरपूर वेग असतो त्यावेळेस मात्र होडीत बसून किल्ल्यात जाणे अत्यंत अवघड होते. किल्ल्याच्या तटाला भरपूर उंची आहे. उत्तरेकडील दार बळणाकार बांधलेले आहे.

किल्ल्याचा तट ताशीव चिन्यांनी उभारला आहे. काही भागात खडकाळ भाग फोडून किल्ल्याचा तट उभारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

एकंदरीत सुवर्णदुर्गाची रचना, भोवतालचा भक्कम तट, बुरुज, एकंदरीत देखणा परिसर इत्यादी अनेक वैशिष्ट्यांनी हा किल्ला आपल्या नजरेत बऱ्याच लांबूनही भरतो.

गुगल मॅप लोकेशन )

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती – रचना व स्थळे

अशा प्रकारच्या जलदुर्गात आपण प्रत्यक्ष गेल्याशिवाय तिथल्या अनेक बारकाव्यांची मना नुसते सांगून वा लिहून समजणार नाही.

निसर्गाची मनसोक्त मजा लुटायला किल्ल्यावर जायलाच हवे. १८०२ मध्ये दुसरा प्रतापी बाजीराव या किल्ल्यात काही दिवस राहिला होता.

रत्नागिरी जिल्ह्यात जे जलदुर्ग आहेत ते शिवकालातील. चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेल्या देखण्या जलदुर्गामध्ये सुवर्णदुर्गाची गणना आपल्याला करावी लागेल.

समुद्रात एका खडकावर हा किल्ला आहे. समुद्राचे पाणी सारखे आपटत असते. पाण्याचा जोर ज्यावेळेस असतो त्यावेळेस होडीत बसून किल्ल्याकडे जायला अवघड जाते.

किल्ल्याच्या तटाचा विचार करता चांगलाच उंच आहे. वळणाकार असे याचे दार बांधले आहे. तटाला बुरुज नजरेला भरण्याइतके आहेत. पाण्याची दोन तळी, काही झाडे आहेत.

ऐतिहासिक निर्देश

शिवाजीमहाराजांनी सुवर्णदुर्ग १६६० मध्ये जिंकला. किल्ल्याची चांगल्या प्रकारे डागडुजी केली आणि आरमार सैन्य वाढवले.

कान्होजी आंग्रे यांचे निधनानंतर तुळाजीच्या काळात आंग्यांचे बलशाली आरमार या सुवर्णदुर्गाचा आश्रय घेऊन राहू लागले. रत्नागिरीतील सर्वच जलदुर्ग चांगले आहेत.

१७५७ मध्ये आंग्रे व इंग्रज यांच्यामध्ये बऱ्याच चकमकी उडाल्या. १८०२ मध्ये या किल्ल्यावर दुसरा बाजीराव राहवयास होता.

किल्ल्याच्या अनेक कारणांनी सुवर्णदुर्ग हा बंदरावरून तसेच समुद्रातून सहजपणे आपल्या नजरेला दिसतो. तसेच नजरेमध्ये भरतो हे विशेष होय.

जलदुर्गाची मजा अनुभवायला एकदा जाऊन आले तरच त्यातले बारकावे जास्त ठळकपणे आपल्या लक्षात येतात.

सोसाट्याचा वारा, पाण्याचा आवाज, पाण्याचा वेगळा वास हा वेगळेपणा आहे तो प्रत्यक्षात किल्ल्यावर गेल्यावरच कळेल.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा