तोरणा किल्ल्याची माहिती | TORNA FORT INFORMATION IN MARATHI –
नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व माहिती मराठी मधून मिळेल.
आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “तोरणा किल्ल्याची माहिती” म्हणजेच “TORNA FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे.
सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.
या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.
तोरणा किल्ल्याची माहिती
शिवाजी राजांच्या काळात ज्या अनेक किल्ल्यांना अथवा गडांना महत्त्व आले त्यापैकी तोरणा अथवा प्रचंडगड होय. या गडाची उंची समुद्रसपाटीपासून १४०४ मीटर फूट आहे. असामान्य उंची तसेच बुधला माचीचा विलक्षण विस्तार केवळ यामुळेच यास प्रचंडगड असे नाव ठेवले असावे असे वाटते. ( गुगल मॅप लोकेशन )
गडावर जाण्याकरिता जी वाट आहे ती अतिशय अरुंद अशी आहे. हा किल्ला चढताना राजगडाची आठवण येते. गजाच्या आधारे गडावर जाता येते. गडाची उंची अधिक असल्यामुळे गडावर चढताना भीती वाटते. आपण वेल्हे-नसरापूर मार्गाने वेल्हयाला आलो की गडाच्या पायथ्याशी आपण येऊन पोहोचतो.
नैऋत्य दिशेने चढावाला सुरुवात होते. या गडाला पूर्वी याहूनही वेगळी व सोपी वाट होती, ती आता अस्तित्वात नाही. दुसरी वाट अशी की राजगडाच्या संजीवनी माचीचा दांडा जो आहे (पश्चिमेस) त्या मार्गाने जर आपण गेलो तर गडावर पोचता येते. फारशी वर्दळ नसल्या कारणाने सगळ्यात व्यवस्थित मार्ग पहिलाच होय. आपण पहाड चढून वर गेल्यावर प्रथम बिनीचा दरवाजा, कोठीचा दरवाजा, तोरणाजाईचे देऊळ असे दिसते. त्याच्यापुढे थोडे चालत गेलो की अंबारखाना, तोरण व खोकड अशी टाकी लागतात.
बालेकिल्ल्यावर असलेले प्रमुख देऊळ मेंगाईचे आहे. मेंगाईच्या डाव्या अंगाला दिवाणघर व उजव्या अंगाला लहान उंचवट्यावर महादेवाचे मंदिर आहे. दीपमाळ व सदरेची जागा आहे. झुंजार बुरुजाकडे आपण वाटचाल करायला लागलो की ढालकाठीची जागा, वेताळ, म्हसोबाचे टाके, इमारती इत्यादी अवशेष आपल्या दृष्टीस पडतात. बालेकिल्यावरून पूर्वेस नजर टाकली तर सिंहगड, खडकवासला, पुरंदर, पुणे असा सारा परिसर आपणास दिसतो. रायरेश्वर व भाटघरही दिसते. पश्चिमेकडे एल्फिन्स्टन टोक, प्रतापगड, मकरंदगड इत्यादी भाग दिसतो. लांबवर पाहिले तर रायगडही दिसतो.
भोर संस्थानतर्फे अश्विन महिन्यात नवरात्रीच्या दहा दिवसात येथे उत्सव (मेंगाईदेवी) करण्यात येत असे. मानकरी, कामकरी, गडकरी अशा साऱ्यांना दहा दिवस जेवण मिळत असे. या उत्सवात साधारण ३०० पान होई. दर तीन वर्षांनी बेल्हे-तोरणा याबाटेबरती भातखळ्याच्या जागी हवालदाराच्या अनुज्ञेने रेडा मारण्यात येत असे, आता ती पध्दत नाही.
- कापूर टाके
- मेंगाई टाके
- भगत दरवाजा
- बिनी दरवाजा
- वळंजाई दरवाजा
- गंगाजाई मंदिर
- पाताळगंगा
- महारवाटा
- झुंजारमाची
- सदरेची जागा
- टकमक बुरुज
- सफेली बुरुज
- फुटका बुरुज
- चिलखती बुरुज
- दारूखाना
- बालेकिल्ला
- महाळी टाके
- महार टाके
- कोकण दरवाजा
- चिणला दरवाजा
- चित्ता दरवाजा
- शिवगंगा
- वेताळ
- दिंडी
- शिडीचा माळ
- मारगिरी जागा
- हनुमान बुरुज
- माळेचा बुरुज
- दिंडी बुरुज
- भेल बुरुज
- घोडे जिन
ऐतिहासिक निर्देश
१७ व्या शतकापर्यंत ज्याच्या ताब्यात किल्ला त्याच्या ताब्यात भोवतालची प्रदेश अशी वस्तुस्थिती असल्याकारणाने शिवाजीमहाराजांनी आपल्या अधिकाराखालच्या प्रदेशातील अनेक जुन्या किल्ल्यांचा जीर्णोध्दार केला व कित्येक नवे बांधले. हे काम सातत्याने वर्षानुवर्षे चालले होते. ( शके १५९३-९४ 3 इ.स. १६७१-७२) या वर्षी महाराजांनी राजगड, सुधागड, सरसगड या तीन
किल्ल्यांच्या संगतीने प्रचंडगडावाही जीर्णोध्दार केला. त्यासाठी ५००० होन खर्ची पडले. (स ८/२२) (शके १६१२ आषाढ शुद्ध, ८ = इ.स. १६९० जुलै ३ ) या दिवशी रामचंद्रपंत अमात्य यांनी कान्होजी झुंजारराव मरळ देशमुख ऊर्फ कानदखोरे यास पत्र पाठवले. त्याचा आशय असा की, तुम्ही खटपट करून प्रचंडगड शत्रूपासून हस्तगत केला; तदनंतर सध्या शत्रू गडावर आला होता त्यावेळी तुम्ही खूप प्रयत्न करून सुटून । प्रचंडगडास आला हे फार चांगले केले. राजगड आणि सिंहगड हे अनून घ्वावयाचे आहेत. याविषयीसुध्दा प्रचंडगडाप्रमाणेच खटपट करावी, आळस करू नये. तुमचे कल्याण होईल.
ह्या पोस्ट सुद्धा वाचा
- महाराष्ट्रातील किल्ले | FORTS OF MAHARASHTRA IN MARATHI
- सिंहगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये | SINHAGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पुरंदर किल्ल्याची माहिती | PURANDAR FORT INFORMATION IN MARATHI
- राजगड किल्ला माहिती मराठी | RAJGAD FORT INFORMATION IN MARATHI
- तोरणा किल्ल्याची माहिती | TORNA FORT INFORMATION IN MARATHI
- रोहिडा किल्ला माहिती | ROHIDA FORT INFORMATION IN MARATHI
- चाकण किल्ला इतिहास | CHAKAN FORT INFORMATION IN MARATHI
- शिवनेरी किल्ल्याची माहिती | SHIVNERI FORT INFORMATION IN MARATHI
- लोहगड किल्ल्याची माहिती | LOHAGAD INFORMATION IN MARATHI
- सज्जनगड ची माहिती मराठी | SAJJANGAD FORT INFORMATION IN MARATHI
- चंदन वंदन किल्ल्याची माहिती | CHANDAN VANDAN FORT INFORMATION IN MARATHI
- वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI
- अजिंक्यतारा किल्ला माहिती मराठी | AJINKYATARA FORT INFORMATION IN MARATHI
- प्रतापगडाची माहिती | PRATAPGAD FORT HISTORY INFORMATION IN MARATHI
- रायगड किल्ला माहिती | RAIGAD FORT INFORMATION IN MARATHI
- कर्नाळा किल्ला मराठी माहिती | KARNALA FORT INFORMATION IN MARATHI
- जंजिरा किल्ला माहिती मराठी | JANJIRA FORT INFORMATION IN MARATHI
- लिंगाणा किल्ल्याची माहिती | LINGANA FORT INFORMATION IN MARATHI
- गडदचा किल्ला, गडद गणपती | GADAD FORT INFORMATION IN MARATHI
- हरिश्चंद्रगड माहिती मराठी | HARISHCHANDRAGAD IN MARATHI
- धोडप किल्ला माहिती | DHODAP FORT INFORMATION IN MARATHI
- पन्हाळगड किल्ला मराठी माहिती | PANHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- पारगड किल्ला माहिती मराठी | PARGAD FORT INFORMATION IN MARATHI
- विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI
- देवगिरी किल्ला माहिती | DEVGIRI FORT INFORMATION IN MARATHI
- सुवर्णदुर्ग किल्ला माहिती मराठी | SUVARNADURG FORT INFORMATION IN MARATHI
- सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | SINDHUDURG FORT INFORMATION IN MARATHI