खरा मित्र (उंदराचे आत्मकथन) मराठी निबंध | TRUE FRIEND ESSAY IN MARATHI

खरा मित्र (उंदराचे आत्मकथन) मराठी निबंध | TRUE FRIEND ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “खरा मित्र (उंदराचे आत्मकथन) मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये TRUE FRIEND ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

खरा मित्र (उंदराचे आत्मकथन) मराठी निबंध | TRUE FRIEND ESSAY IN MARATHI

पाहिलंत? एवढा महापराक्रमी, प्रचंड ताकदवान, सगळयांचा थरथराट करणारा हा सिंह कसा बंदीवान झाला आहे! हा जंगलाचा राजा किती केविलवाणा होऊन ओरडत आहे! आता तुम्ही पाहतच राहा. या जंगलच्या राजाला मी कैदेतून मुक्त करतो की नाही ते! होय, होय, मीच. मी इटुकला पिटुकला उंदीर या जंगलच्या राजाला सोडवणार!

काय म्हणता? मी एवढा शहाणपणा का करतोय? बरं का साहेब, हा शहाणपणा नाही. ही कृतज्ञता आहे. तुम्हांला खरं वाटत नाही ना? वाटलंच मला. तुमचे अन्न व धान्य मी खातो. तुमचे कपडे व पुस्तके कुरतडून टाकतो. विळं करून तुमची घरं खराब करतो. त्यामुळे मी वाईट आहे, असंच तुम्हाला वाटणार. पण ऐका आता…

हे सिंहमहाराज एकदा विश्रांती घेत होते. मला आपली गंमत करावीशी वाटली. मी त्याच्या अंगावर उड्या मारल्या. त्यांनी मला हाकलायचा प्रयत्न केला. पण मी पुन्हा पुन्हा त्यांना सतावीत राहिलो. त्यांच्या शेपटीला ओढलं.

मी माझी शेपटी त्यांच्या कानात घातली, त्यांच्या नाकात घातली. असं काहीबाही करीत राहिलो. मग कारय ? त्यांना संताप आला. त्यांनी मला पकडलं. रागाच्या भरात मला मारूनच टाकणार होते. पण मी त्यांना शरण गेलो. त्याच्याकडे गयावया केली.

भविष्यात त्यांना मदत करीन, असं वचन दिलं. त्यांना या वचनाची गंमतच वाटली. ते हसले, पण त्यांनी मला सोडून दिलं.

आता बघा. या जाळ्याचा एकेक दोर मी कुरतडून टाकणार. हळूहळू संपूर्ण जाळंच तोडणार. मग सिंहमहाराज मुक्त होतील. त्या वेळी त्यांनी मला जीवदान दिलं होतं. माझे प्राण वाचवले होते.

आज मी त्याची परतफेड करणार, त्यांचा जीव वाचवणार. कोणी लहान असतो, म्हणून कमी महत्त्वाचा नसतो. प्रत्येकाचं सामर्थ्य वेगळं असतं; हे तुम्ही माणसांनी लक्षात ठेवल पाहिजे.

हे निबंध सुद्धा वाचा –