वाचाल तर वाचाल निबंध मराठी | VACHAL TAR VACHAL ESSAY IN MARATHI

वाचाल तर वाचाल निबंध मराठी | VACHAL TAR VACHAL ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “वाचाल तर वाचाल निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये VACHAL TAR VACHAL ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

वाचाल तर वाचाल निबंध मराठी | VACHAL TAR VACHAL ESSAY IN MARATHI | निबंध १

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • वाचाल तर वाचाल
  • शिक्षणाचे महत्त्व
  • उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आवश्यक
  • स्वत: धनप्राप्ती करून शिक्षण घेणे
  • पाश्यात्त्य देशांत स्वावलंबी विद्यार्थी
  • कर्मवीर भाऊराव पाटील यांची योजना
  • प्राचीन काळ व आधुनिक काळ यांतील फरक
  • कष्ट करण्यात संकोच नको
  • कष्ट करून शिक्षण घेणाऱ्याला ज्ञानाची किंमत कळते

‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना देऊन ठेवला आहे. शिक्षणाचे महत्त्वही आज सर्वमान्य झाले आहे. त्याचबरोबर हेही मान्य आहे की, आजकाल कोणतेही शिक्षण घ्यायचे ठरवले तर त्यासाठी खर्च खूप येतो. प्राथमिक शिक्षण सरकारने मोफत केले आहे.

मुलींसाठी माध्यमिक शिक्षणही मोफत आहे. परंतु यशस्वी जीवन जगण्यासाठी केवळ शालेय शिक्षण पुरेसे नाही. त्यासाठी उच्च शिक्षण किंवा काहीतरी व्यवसाय शिक्षण किंवा धंदेशिक्षण घेणे नितांत आवश्यक असते. सगळ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या हे शक्य नसते शिक्षण तर घ्यायचे आहे; पण ‘दामाजीची कृपा’ नाही. मग काय करायचे?

या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘कमवा आणि शिका’, ‘कमवा आणि शिका’ ही कल्पना काही आपल्याला नवीन नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेडोपाडी हिंडून मुले गोळा केली आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. तेव्हा त्या योजनेचा पाया होता, ‘कमवा आणि शिका.’ कष्ट करा, शेतात राबा, स्वतःचे पोट भरण्याची व्यवस्था करा आणि शिक्षण मिळवा, अशी त्यामागील कल्पना होती.

प्राचीन काळी विदयार्थी ज्ञानसंपादन करण्यासाठी गुरुगृही जात. या आश्रमांना राजाचा व धनिकांचा आश्रय असे. मात्र शिष्यांना तेथे कष्ट करावे लागत. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही सांदिपनी ऋषींच्या आश्रमात कष्ट करावे लागले होते. या शिष्यांना गुरुगृही घरातील कामांपासून ते शेतीपर्यंतची अंगमेहनतीची सर्व कामे करावी लागत. साहजिकच या कामात ते कुशल बनत असत. जीवनाला आवश्यक असे प्रशिक्षणच तेथे मिळे.

अनेकदा बेकारांच्या बाबतीत विचित्र परिस्थिती उद्भवते. कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसते म्हणून अनुभव मिळत नाही. परिणामी त्यांना घरीच बसावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून सुद्धा ‘कमवा. आणि शिका’ ही संकल्पना राबवली जाते.

अशी सुविधा असलेल्या संस्थेत अननुभवी तरुणांना ‘शिकाऊ उमेदवार’ म्हणून नेमतात. त्यांना विशिष्ट प्रकारचे काम शिकवले जाते. त्यात त्यांना कुशल बनवतात. या काळात त्यांना पगार मिळत नाही, पण बऱ्यापैकी रक्कम विद्यावेतन म्हणून देतात. त्यामुळे शिकणाऱ्याला हुरूप येतो.

शिकण्याचे काम अगदीच फुकट गेले असे वाटत नाही आणि शिकल्यानंतर नोकरी नक्की मिळेल, याची खात्री असते. खरे तर ही पद्धत सर्वच ठिकाणी वापरली पाहिजे: अगदी बँका, सरकारी कचेऱ्या येथेसुद्धा. यामुळे बेकारीची समस्या सुटण्यास मदत होईल.

वाचाल तर वाचाल निबंध मराठी | VACHAL TAR VACHAL ESSAY IN MARATHI | निबंध २

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • छंद कोणकोणते? छंद कशाला हवेत ? छंदांचा लाभ
  • वाचनकला प्रयत्नसाध्य
  • वाचनछंदाची किमया
  • वाचनाचे फायदे
  • कोठे कोठे उपयोगी
  • वाचनाचा व्यक्तिशः होणारा फायदा

‘असा धरी छंद। जाई तुटोनिया भवबधं।’ आपल्या संतमहात्म्यांची ही शिकवण आहे. माणसाला कुठला ना कुठला तरी छंद हा हवाच! कारण त्यामुळे त्याला रोजच्या चाकोरीबद्ध जगण्याचा कंटाळा येत नाही. छंद नाना प्रकारचे असतात. काही छंद खूप खर्चीक असतात, तर काही जणांचे छंद हे इतरांना त्रासदायक ठरतात.

‘राजा केळकर म्युझियम’ उभारणाऱ्या केळकरांना नाना गोष्टींचा संग्रह करण्याचा छंद होता, त्यांतून ‘राजा केळकर संग्रहालय ‘ ही फार मोठी राष्ट्रीय संपत्ती निर्माण झाली. अभिनेते चंद्रकांत मांढरे आपल्या फावल्या वेळात सुंदर निसर्गचित्रे काढत. आज त्यांच्या या छंदातून देशाला एक रम्य ‘आर्ट गॅलरी’ उपलब्ध झाली.

‘वाचन’ हा असाच एक उपयुक्त छंद आहे. पण या छंदाची ओळख अगदी लहानपणीच व्हायला हवी. एकदा भाषेतील अक्षरांची ओळख झाली की माणसाला वाचायला येऊ लागते. मला आठवतेय, जेव्हा आपल्याला प्रथम वाचायला येते, तेव्हा आपल्याला किती विलक्षण आनंद होतो! मग दिसतील ते शब्द आपण वाचू लागतो. रस्त्यावरच्या पाट्या, पुडी म्हणून आलेले कागद सगळे आपल्या नजरेखालून जातात.

वाचनाचा छंद आपल्याला लागायला कुणीतरी कारणीभूत होत असते. कधी आपली आई आपला हा छंद जोपासत असते, तर कधी आजी निमित्त होते. एखादे शिक्षक त्या बालवयात वाचनाचे वेड आपल्याला लावतात आणि मग आपण वाचतच राहतो.

ज्ञान है अगाध आहे. त्याला एक जन्म पुरणार कसा! मग वाचक आपली आपली आवड ठरवतो. त्या प्रकारचे जास्तीत जास्त वाचन करतो.

वाचनाने ज्ञानप्राप्ती होते आणि मनोरंजनही होते. वाचन माणसाला मोठे करते. त्याचे मन विशाल करते. वाचताना आधीव्याधींचा विसर पडतो. आपण एका वेगळ्याच जगात जातो. मग तो ‘हँरी पॉटर’ असला तर आपण त्याच्याबरोबर अद्भुत जगात शिरतो. ‘गोट्या’ असला तर गरिबांचा विचार करू लागतो. वाचनाचा छंद जोपासताना आपल्याला ग्रंथालयांचे साहाय्य मिळते. तरीपण काही आवडलेली पुस्तके आपण स्वतः खरेदी करून संग्रही ठेवतो.

वाचनाचा छंद असलेल्या कधीच कंटाळा येत नाही. प्रवासात, एकटे असताना, अगदी दुःखाच्या प्रसंगीही पुस्तके साथ करतात. कदाचित मित्र कंटाळा करील; एक वेळ आईवडीलही थकतील; पण पुस्तक कधी कंटाळा करीत नाही, थकत नाही. आपल्याला जेव्हा हवी तेव्हा, जिथे हवी तिथे साथ करायला पुस्तके तयार असतात.

वाचन आपल्याला बहुश्रुत करते, समृद्ध करते. विशाल जगाचा परिचय करून देते. ‘ग्रंथ हेच सर्वश्रेष्ठ गुरु होत’, असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे, ते उगाच नाही. म्हणून वाचनाचा छंद प्रत्येकाने जोपासायला पाहिजे.

हे निबंध सुद्धा वाचा –