वर्तमानपत्रे बंद झाली तर मराठी निबंध | VARTMAN PATRA BAND ZALI TAR ESSAY IN MARATHI

वर्तमानपत्रे बंद झाली तर मराठी निबंध | VARTMAN PATRA BAND ZALI TAR ESSAY IN MARATHI – नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “वर्तमानपत्रे बंद झाली तर मराठी निबंध” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.

हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.

लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल. 

आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत. 

या निबंधामध्ये VARTMAN PATRA BAND ZALI TAR ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.

निबंध‍ात सामाविष्ठ केलेले मुद्दे

  • मोबाइलवरून बातम्या
  • टीव्ही चॅनल्सच्या बातम्या
  • छापील वर्तमानपत्रांचे महत्त्व
  • वर्तमानपत्रे बंद होऊ नयेत.
  • वर्तमानपत्रांचे उपयोग

वर्तमानपत्रे बंद झाली तर

हल्ली सगळ्यांच्या हातात मोबाइल असतात. त्यामुळे सगळ्या जगभराच्या बातम्या लगेचच सगळ्यांना कळतात. व्हाट्सएप, फेसबुक यांच्या माध्यमातून या बातम्या सगळीकडे भराभर पोहोचतात. त्यामुळे सकाळी उठून वर्तमानपत्रे वाचण्याची गरज वाटत नाही.

मग, वर्तमानपत्रे विकत तरी कशासाठी घ्यायची? खरेच, वर्तमानपत्रे बंद झाली तर? काय होईल बरे! मोबाइल, टीव्ही चॅनल्स आपापल्या परीने विविधरंगी बातम्या दाखवतात. आपण सगळे उत्साहाने त्या पाहत असतो.

विविध विषयांवरच्या चर्चा, मुलाखती, घटनास्थळांवरील चित्रफिती इत्यादी माध्यमांतून रोचक बातम्या रोज पाहायला मिळतात. त्यामुळे ही माध्यमे वर्तमानपत्राची जागा घेतील; पण या माध्यमांसाठी ठरावीक वेळ दयावा लागतो.

मोबाइल, टीवी, संगणक ही सगळी विजेवर अवलंबून असलेली माध्यमे आहेत. तसेच ती महाग, खर्चीकही आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात ही माध्यमे अत्यल्प प्रमाणात वापरली जातात.

वर्तमानपत्रे अत्यल्प खर्चीक आणि वापरही सहज व सुलभ असतो. त्यामुळे वर्तमानपत्राचे महत्त्व कमी होणे अशक्य आहे, असे मला वाटते.

छापील वर्तमानपत्रे आपल्यासाठी हवी तेव्हा आणि हवी त्या ठिकाणी आनंद देणारी मेजवानी आहे. यातील बातम्या अधिक काळ आपल्याजवळ टिकून राहतात. त्या गरज असेल तेव्हा वाचू शकतो.

विविध पुस्तकांची परीक्षणे, चित्रपट क्रोडाविश्व, सामाजिक घटना, बालगीत, अर्थकारण वगैरे माहिती वर्तमानपत्रांतून माणसाला सहज उपलब्ध होते. तसेच ही माहिती कधीही, कुठेही, केव्हाही वाचता येते. त्यामुळे वर्तमानपत्रे बंद होऊन चालणार नाही.

हे निबंध सुद्धा वाचा –