वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI

वासोटा किल्ला माहिती मराठी | VASOTA FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “वासोटा किल्ला माहिती मराठी” म्हणजेच “VASOTA FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे. या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

वासोटा किल्ला माहिती मराठी व ठिकाण

कोयनेच्या खोऱ्यात तांबी नावाचे खोरे आहे. त्याच्याजवळ मेटइंदोली आणि वासोटा अशी दोन गावे आहेत.

सह्याद्रीच्या एका फाट्यावर वासोटा नामक किल्ला आहे. ( गुगल मॅप )

मेटइंदोली या गावापासून किल्ल्यास वाट जाते. या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण ११७१ मी. आहे. आपल्याला जाताना कारवीचे दाट जंगल लागते.

किल्ल्याकडे जाताना आपली दमछाक चांगलीच होते.

गडावर फारसे पहाण्यासारखे काही नाही. माथा सपाट आहे.

चार टाकी, महादेवाचे, चंडिका देवीचे प्राचीन मंदिर पहावयास मिळते.

पिण्याच्या पाण्याकरिता धाकट्या तळ्याचे पाणी गोड आहे.

ऐतिहासिक निर्देश

वासोटा हा किल्ला भोज शिलाहाराने बांधला.

सन १६५५ मध्ये शिवाजीने हा किल्ला जिंकला अशी नोंद आढळते. या गडाचे त्यावेळेस शिवाजीने व्याघ्रगड असे नाव ठेवले होते.

शिवकालामध्ये एक उत्तुंग तुरुंग म्हणून याचा वापर करण्यात येई.

किल्ल्याचे सेनापती बापू गोखले यांनी मॉरिसन व हंटर या दोन गोऱ्यांना पकडून या ठिकाणी ठेवले होते.

ताई तेलिणीकडून बापू गोखले यांनी गड घेण्याचा असफल प्रयत्न केला.

वासोटा किल्ला माहिती मराठी व रचना

किल्ल्याच्या पश्चिम दिशेस बाबूखाड नावाचा कडा दीडशे फूटांहून अधिक खोल आहे.

सध्या पडक्या अवस्थेत एक मोठा वाडा आहे. बाबूखाडच्या इथे आपण उभे राहिल्यास कोकणचा परिसर मोठा सुंदर दिसतो.

प्रत्यक्ष गडावर गेल्याखेरीज सुंदर या शब्दाचा अर्थ समजणार नाही.

दमदार बांध्यांचे जे आहेत त्या निसर्ग वेड्यांना या गडावर जाण्यात निश्चितच आनंद वाटेल.

एकंदरीत किल्ल्याचा विचार करता वासोटा हा किल्ला अगदी समृध्द वाटतो हे नाकारून चालणार नाही.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा