विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI

विशाळगड किल्ला माहिती मराठी | VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI – 

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही “विशाळगड किल्ला माहिती मराठी” म्हणजेच “VISHALGAD FORT INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच किल्लांचे महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील किल्ले व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

विशाळगड किल्ला माहिती मराठी व ठिकाण

पावसाळा वगळता इतर महिन्यांमध्ये गडापर्यंत एस. टी. बसेस जातात.

आंबेघाटापासून जो डाव्या हातास रस्ता फुटतो, तो रस्ता पांढरपाणी व गजापूर या गावांवरून विशाळगडापर्यंत जातो.

गुगल मॅप लोकेशन )

ज्या ठिकाणी बस थांबते त्याच्या पलीकडे एक दरी आपल्याला दिसते. ती मागे टाकली की, थोड्या पायऱ्या चढल्यावर आपण गडावर पोचतो. सध्या गडाचे सर्व दरवाजे पडक्या स्थितीतच आढळतात.

नाही म्हणायला एक मुढ़ा दरवाजा आपणास दिसतो. गडाच्या आत आपण शिरल्यावर एक लहान टेकडी आपल्याला दिसते.

त्या टेकडीच्या पलीकडे सरकारवाडा, पिराचा दर्गा, भोपाळ तळे, अर्धचंद्र नावाची दोन तळी आपणास आढळतात.

विशाळगड किल्ला माहिती मराठी – रचना व स्थळे

भोपाळ तळ्याच्या क्षेत्रफळाचा विचार करता साधारण ६५० मीटर आहे. तळे भूपाळ नावाच्या नृपाने बांधले असे म्हणतात.

अर्धचंद्र तळे ५ मीटर रुंद, ५॥ मीटर लांब व ३ मीटर खोल आहे. तळ्याच्या काठावर एक सुंदर महादेवाचे देऊळ आहे. शेजारी पुजाऱ्यांची थोडीफार घरे आहेत.

देवालयातील शिवलिंग खरोखरच बघण्यासारखे आहे. या वस्तीच्या पश्चिम दिशेस डाव्या हाताला एक पाताळ लोक नावाची दरी आहे. त्यात फुलाजी, बाजीप्रभू यांच्या समाध्या आढळतात.

वस्तीच्या उजव्या हाताला राजाराम महाराजांच्या पत्नीचे, अंबिका ऊर्फ अहिल्याबाईचे स्मारक आहे.

ऐतिहासिक निर्देश

गजापूर गावापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर इतिहासप्रसिध्द पावनखिंड लागते. याच त्या गाजलेल्या खिंडीत नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी केवळ ३०० मावळ्यांच्या सहाय्याने पराक्रमाची शर्थ केली.

सिद्दी जौहारच्या सैन्याला मोठ्या धीराने व कौशल्याने बाजी प्रभु थोपवून धरले होते.

ठरल्याप्रमाणे तोफांचे आवाज कानी पडताच वीर बाजी प्रभूनी आपला प्राण सोडला. बाजी प्रभुंचा देह विशाळगडावर नेल्यानंतर राजांनी त्यांचा अंत्यसंस्कार करायला.

औरंगजेबाने मोठ्या शर्थीने किल्ल्यास दिलेला वेढा ( १८६९ ) बरेच दिवस होता. जेव्हा मराठ्यांची चारी बाजूंनी कोंडी झाली त्याच वेळेस मराठ्यांनी विशाळगड सोडला.

कोल्हापूरकर स्त्रपतींनी हा किल्लापंतप्रतिनिधींना दिला. त्यावेळेस येथीलवाड्यात राहून संपूर्ण संस्थानाचा कारभार ते पाहत असत. हा किल्ला भोज शिलाहाराने बांधला.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा