यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI

यावल ( पाल ) अभयारण्य माहिती | YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI

नमस्कार मित्रांनो, आपले या वेबसाइट वर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाइट वर तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व  माहिती मराठी मधून मिळेल. 

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही यावल ( पाल ) अभयारण्य माहिती मराठी” म्हणजेच “YAVAL WILDLIFE SANCTUARY INFORMATION IN MARATHI” यावर विसतृत चर्चा केलेली आहे. 

सोबतच अभयारण्यांची माहिती महत्त्व व जोपासणी यांवरही सविस्तर लिहीले आहे.

या वेबसाइट वर तुम्हांला महाराष्ट्रातील अभयारण्ये व ठिकाण यांची ही माहिती दिलेली आहे.

यावल अभयारण्य माहिती मराठी व ठिकाण

यावल व पाल अशा दोन्ही नावानी परिचित असलेले उत्तम अभयारण्य आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अभयारण्याचा विस्तार १७७.५२ चौ. कि. मी. इतका आहे. या विभागात सुकी नावाची नदी आहे, निसर्गाचे वरदान लाभलेला.

हा परिसर आहे, पाल व यावल ही खेडी आहेत. या दोन्हीतील अंतर २० कि. मी. चे आहे. या अभयारण्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ४०० मीटर आहे.

गुगल मॅप लोकेशन )

अभयारण्याचा सुंदर परिसर, वाहणारी सुकी नदी, डोंगराच्या रांगा यामुळे अस्सल जिवंतपणाचे चित्र आपल्याला प्रत्यक्षात पाहवयास व अनुभवायला मिळते.

आजकाल शासनाच्या प्रयत्नाने पर्यटन या व्यवसायाला एकगती आली आहे. पर्यटन निवास व्यवस्थेमुळे पर्यटकांना अधिक, सोयीचे झाले आहे.

पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणचे गिर्यारोहक तरुण वर्ग मोठ्या संख्येने भेट देताना आढळतात ही एक सुखद गोष्ट आहे.

आजकालच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात निसर्ग पाहणे ही एक गरज झाली आहे असे वाटते. चक्क एके दिवशी मनाशी ठरवावे, नियोजन करावे व कमीत कमी योग्य ते सामान घेऊन अभयारण्याची वाट पकडावी.

प्राणी संपत्ती

या अभयारण्यात बिबळ्या, रानमांजर, नीलगाय, उत्तरी माकड, हनुमान वानर इत्यादी प्राणी दिसून येतात, जंगली कुत्रे, सांबर, कोल्हा, तरस, वाघ, भेकर, हरिण यांचेही दर्शन घडते.

विविध प्रकारचे पक्षी येथील शोभा वाढवतात. या वनप्रदेशामध्ये साग, अंजन, ऐन, धावडा, खैल, साळई, हळद ही झाडे प्रामुख्याने दिसतात.

जळगावपासून हे ठिकाण ५० कि. मी. अंतरावर आहे. मार्च ते जून हा काळ भेट देण्यास उत्तम होय.

कोल्हा

कोल्हा हा प्राणी सर्वसाधारण सगळ्यांच्या परिचयाचा आहे. कोल्ह्याच्या चतुरपणाच्या गोष्टी सर्व ज्ञात आहेत.

हा प्राणी जसा लबाड आहे. तसा चतुरही आहे. या प्राण्याची उंची सुमारे ३७ ते ४२ सें. मी. असते.

डोके आणि शरीर मिळून याची लांबी सुमारे ६० ते ७५ सें. मी. असते. शेपटाची लांबी २० ते २८ सें.मी. असते. याची शेपूट केसाळ व झुपकेदार असते.

या प्राण्याचे वजन ८ ते १२ किलो ग्रेम असते याच्या भुवया वरती वळलेल्या नसतात. या प्राण्याचे मोठे कपाळ व भुवया फार क्रूर व भारदस्त दिसतात.

हा प्राणी महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो. दमट हवामानाचे दाट जंगल, सुके रखरखीत जगल, माळरान, विरळ अरण्य, खेडोपाडी, शेतात अशा विविध ठिकाणी हा प्राणी आढळतो.

संध्याकाळ झाली की लपत छपत बाहेर पडतात. साधारण ढगाळ हवा तसेच थंडीच्या दिवसात ते दिवसभर बाहेर असतात.

या प्राण्याचे आवडते खाद्य म्हणजे कोंबडी, बदक, तित्तर, होला इत्यादी होय.

जंगलामधून फिरताना कोल्हा हा प्राणी ज्यावेळेस टोळीने फिरतो त्यावेळेस तो लहान हरीण अथवा काळवीटाची शिकार करतो.

कोल्ह्यांना वर्षभरात कधीही पिले होतात. पिले मादीच्या बरोबर फिरण्याइतपत वाढेपर्यंत त्यांना लपवले जाते. या प्राण्याचे आयुष्य १२ वर्ष इतके असते.

ह्या पोस्ट सुद्धा वाचा